Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

heaing logo

heaing logo

शहादा येथील भूमिअभिलेख कार्यालयातील भुकर मापक लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात

लाच लुचपत विभागाचे पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली आज ,उप अधीक्षक भूमिअभिलेख कार्यालय , शहादा येथील भुकर मापक अभिजित अर्जुन वळवी वय 43 यांना पाच हजार लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. सविस्तर रुत्त असे की,तक्रारदार यांची मालकीची हिंगणी शिवारात तालुका शहादा येथे गट नंबर 17 ही  शेतजमीन आहे. यापूर्वी या शेताची आरोपी यांनी मोजणी केली आहे परंतु आरोपी लोकसेवक यांनी शेत मोजणीचे शीट तक्रारदार यांना दिलेले नाही. तक्रारदार यांनी त्यांच्या शेताच्या मोजणी बाबतचे शिट आरोपी लोकसेवक यांना मागीतले असता आरोपी लोकसेवक यांनी तक्रारदार यांना त्यांच्या शेतमोजणीचे मोजणी शिट देण्याच्या मोबदल्यात प्रथम दहा हजार रुपयांची व तडजोडीअंती पंचांसमक्ष पाच हजार रूपयांची मागणी केली. आरोपी अभिजित अर्जुन वळवी यांनी आज दिनांक ०६/०२/२०२५ रोजी  तक्रारदार यांच्याकडून पाच हजार रुपये लाचेची रक्कम पंचांसमक्ष स्विकारली असता . याबाबत शहादा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  सापळा अधिकारी नेहा सूर्यवंशी तसेच  सापळा पर्यवेक्षण अधिकारी  राकेश चौधरी यावेळी सापळा कार्यवाही पथक  पोलीस निरीक्षक नरेंद्र खैरनार विलास पाटील ,  हेमंत महाले ,  विजय ठाकरे, पोहवा/ देवराम गावित, संदीप खंडारे , जितेंद्र महाले ,नरेंद्र पाटील ,सुभाष पावरा सर्व नेमणूक अँटी करप्शन ब्युरो, नंदुरबार.शहादा तालुका

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.