@ आ. शिरीषकुमार नाईकांनी कोरोना महामारी च्या काळात स्थलांतरित मजूरांना 9 कोटी उपलब्ध करून दिले होते..!!
नवापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिरीषकुमार सुरूपसिंग नाईक यांची महाराष्ट्र विधिमंडळ रोजगार हमी योजना समितीच्या सदस्य पदी नियुक्ती करण्यात आली आहे.विधानसभा सचिव जितेंद्र भोळे यांच्या स्वाक्षरीने आदेशाची अंमलबजावणी करण्यात आली आहे.रोजगार हमी योजना समितीच्या प्रमुखपदी आमदार सुनील शेळके यांची नियुक्ती करण्यात आली आहे तर सदस्य पदी नवापूर आमदार शिरीषकुमार नाईक, अक्कलकुवा-धडगाव आमदार आमश्या पाडवी यांची निवड झाली.
आमदार शिरीषकुमार नाईक यांची या नियुक्तीमुळे ग्रामीण भागातील तसेच आदिवासी बांधवांना रोजगार हमी योजनेच्या अंमलबजावणींना चालना मिळेल अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
पुढे नाईक म्हणाले की, कोरोना महामारी च्या काळात स्थलांतरित मजूर आपल्या गावी आले. पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला उत्पन्नाचे साधन नव्हते. अशा काळात शासनाच्या मनरेगा या योजने लोकांना तारले, दोन वेळच्या पोटाचा प्रश्न सुटला आणि खरोखर खरीप हंगामात पेरणीसाठी कुणापुढे हात पसरण्याची वेळ आली नाही. स्वं जीवन जगता आले त्यामुळे कोरोना महामारीच्या काळात स्वयंरोजगार गावातच मिळाल्याने बहुतांश मजूर, नागरिक,व्यापारी यांना जी आर्थिक झळ बसणार होती त्यापासून बचावले आहे.
लाॅकडाऊन कालावधीत नंदुरबार जिल्ह्यातील हजारोच्या संख्येने गुजरात राज्यात रोजगारासाठी स्थलांतरीत झालेल्या मजुरांना लाॅकडाऊन दरम्यान काम नसल्याने गावी परतीचा प्रवास करून जिल्ह्यात दाखल झाले. गावी येऊन गावात रोजगार नसल्याने पोट कसे भरावे ? हताशा झालेल्या मजुरांना बिकट परिस्थितित आमदार शिरीषकुमार नाईक यांनी नवापूर पंचायत समिती प्रशासनाने मनेरगा योजना अंतर्गत रोजगार उपलब्ध करून दिला.अनेक ठिकाणी आमदार शिरिषकुमार नाईक यांनी पाहणी करून ग्रामस्थांना रोजगार उपलब्ध करून दिल्याने समाधान व्यक्त केले आहे. नंदुरबार जिल्ह्यातील सर्व तालुक्यात योजना सुरू करण्यात आली.
लाॅकडाऊनच्या काळात ३,८९,३६३ मनुष्यदिन रोजगार निर्माण करण्यात आला. या कालावधीत १९१२१ कुटुंबातील ३१५७३ अकुशल मजूर कामावर आले.त्यांना ९ कोटी २२ लक्ष इतकी मजुरी तालुका स्तरावरून देण्यात आली. यातून आदिवासीबहुल भागातील नागरिकांचे कृषिविषयक बियाणे खते खरेदी करण्यासाठी मोठी मदत झाली.
नंदुरबार जिल्ह्यातील ३० हजार स्थलांतरीत व गावातील मजुरांना हाताला काम मिळाल्याने समाधान व्यक्त केले.गाळ काढण्यातून जलसंधारण होऊन भूगर्भातील पाण्याची पातळी वाढेल.एक मजूर १ क्यूब मीटर गाळ एका दिवसात काढतो.त्यामुळे १००० लीटर पाणी साठवण क्षमता तयार होते व त्याच्या दुप्पट भूगर्भात पाणी साठा वाढतो. गाळ शेतात टाकल्याने जमीन सुपीक होईल उत्पादनात वाढ झाली.
आमदारकीचा काळात त्यांनी स्थानिक आदिवासी बांधवांना रोजगार मिळवून दिल्याबद्दल तसेच रोजगार हमी योजनेत ठोस उपाययोजना व नवीन प्रकल्प राबवले जातील असा विश्वास व्यक्त करीत त्यांच्या चाहत्यांनी त्यांच्या निवडीचे स्वागत केले आहे.
महाराष्ट्र रोजगार हमी योजनेच्या अध्यक्षपदी सुनील शेळके व सदस्य पदी आमदार शिरीषकुमार नाईक आमश्या पाडवी व इतर सदस्यांची निवड झाल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून नवनिर्वाचित अध्यक्ष व सदस्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे