युवा व्याख्याते व समाज प्रबोधनकार प्रा.वसंत हंकारे (सांगली) यांचे विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा देणारे प्रेरणादायी व्याख्याना कडे लक्ष
नवापूर -जागतिक महिला दिनानिमित्त दि ८ मार्च शनिवार रोजी आमदार.शिरीषकुमारजी नाईक व नंदुरबार जि.प.माजी अध्यक्षा.सौ.रजनीताई नाईक तथा नवापूर तालुका दैनिक पत्रकार संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने युवा व्याख्याते व समाज प्रबोधनकार प्रा.वसंत हंकारे (सांगली) यांचे विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा देणारे प्रेरणादायी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.
पालक महिलांसाठी आणि समाजविरोधी पाऊल उचलणाऱ्या युवक-युवती व आमच्या आई बहिणींसाठी मातापित्यांची महती व त्यांनी आपल्यासाठी केलेल्या काबाडकष्टांची जाणीव करून देणारे अंगावर शहारे आणणारे डोळ्यात अश्रू तरळण्यास भाग पाडणारे..प्रत्येकाने ऐकतच राहावे असे हृदयस्पर्शी व्याख्यान "तरुण मुला-मुलींना न समजलेले आईबाप" या विषयावर समाज प्रबोधनकार प्रा.वसंतजी हंकारे व्याख्यान करणार आहेत.
:दि.८ मार्च शनिवारी सायंकाळी ७.30 वाजता सरदार चौकात, बंधू-भगिनी विद्यार्थ्यांनी या जाहीर व्याख्यानाचा लाभ घ्यावा असे आवाहन दैनिक पत्रकार संस्थेचे अध्यक्ष सुधीर निकम,सचिव महेंद्र जाधव व पदाधिकार्यांनी केले आहे