राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या तालुका अध्यक्षपदी वैशाली चौधरी तर नवापूर तालुका अध्यक्षपदी मंदा वळवी व नवापूर शहराध्यक्षपदी चित्रा चव्हाण
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ अभिजित मोरे यांच्या हस्ते नियुक्ती पत्रांचे वाटप
नवापूर (प्रतिनिधी)राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीच्या तिघा महिलांना नियुक्ती पत्रांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ अभिजित मोरे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीच्या जिल्हाध्यक्षा सिमा हेमंत सोनगरे हया उपस्थित होत्या.
राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या नंदुरबार तालुकाध्यक्षपदी वैशाली मनोज चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली.तर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या नवापूर तालुकाध्यक्षपदी मंदा कुंदन वळवी व नवापूर शहर अध्यक्षपदी चित्राबाई तुळशीराम चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजीतदादा पवार यांच्या नेतृत्वात, प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्या मान्यतेने व महिला प्रदेशाध्यक्ष रुपालीताई चाकणकर यांच्या मार्गदर्शनाने ही नियुक्ती करण्यात आली आहे.स्थानिक स्वराज्य़ संस्थांच्या निवडणूका येऊ घातलेल्या आहेत.अशातच पक्ष बांधणीवर सद्या जोर देण्यात येत आहे. पक्षाच्या वाढीसाठी तसेच पक्षाचे ध्येय धोरणे सर्वसामान्यपर्यंत पेाहचविण्यासाठी नियुक्त्यांचे सत्र सुरु आहे. महिलांचे सामाजिक काम पाहून हया नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.
नियुक्ती पत्राचे वाटप झाल्यानंतर पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ अभिजित मोरे यांनी सर्वांचे अभिनंदन केले तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. नव्या महिला अध्यक्षांनी लवकर कार्यकारिणी तयार करावी,अशा सुचना देण्यात आल्या. पक्ष वाढीसाठी महिलांचा सहभाग वाढवून शासनाच्या योजना तळागाळापर्यंत पोहचवून पक्ष संघटन वाढीवर भर देऊ,अशी ग्वाही नवनियुक्त़ महिला अध्यक्षांनी दिली.