सन 2024-25 या वर्षात अधिसूचित सेवा नियत कालावधीत देवून उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल नवापूरचे तहसीलदार दत्तात्रय जाधव यांच्या जिल्हाधिकारी यांच्या हस्ते प्रशस्ती पत्र देऊन गौरव
नवापूर प्रतिनिधी-
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बिरसा मुंडा सभागृहात महाराष्ट्र राज्य लोकसेवा हक्क आयोग सन 2024-25 28 एप्रिल सेवा हक्क दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी
महाराष्ट्र राज्य लोकसेवा हक्क अधिनियम-2015 च्या अनुषंगाने सन 2024-25 या वर्षात अधिसूचित सेवा नियत कालावधीत देवून उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल नवापूरचे तहसीलदार दत्तात्रय जाधव यांना जिल्हाधिकारी डॉ मिताली सेठी यांच्या हस्ते प्रशस्ती पत्र देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी अंजली शर्मा, तहसिलदार दिपक धिवरे (तळोदा), दिपक गिरासे (शहादा), दत्तात्रय जाधव (नवापूर), नायब तहसिलदार राजेश अमृतकर (नंदुरबार), दिलीप गांगुर्डे (अक्कलकुवा) व किसन गावीत (अक्राणी) या अधिकाऱ्यांना ही प्रशस्तीपत्र देण्यात आले.