नवापूर येथे एसटीच्या 77 वा वाढदिवस आमदार शिरीष कुमार नाईक यांच्या हस्ते पाच नवीन बसेस चे उद्घाटन व केक कापून वाढदिवस साजरा..!
नवापूर येथील एसटी आगारातर्फे बस स्थानका वर लालपरी एस.टी च्या 77 वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला.१ जून १९४८ रोजी पुणे अहिल्यादेवी मार्गावर एसटी महामंडळाची पहिली बस धावली होती. या अनुषंगाने व सन्मानार्थ एसटी महामंडळाकडून दि.1 जून हा दिवस एसटी महामंडळाच्या वर्धापन दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या अनुषंगाने नवापूर बस स्थानकावर नवापूर आगाराला आरामदायी व सुरक्षित अशा ५ बसेस मिळाल्या आहेत. या बसेसचे उद्घाटन नवापूर विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार शिरीष कुमार नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी नवीन बसेसचे पूजन व श्रीफळ फोडून उद्घाटन केले.त्यानंतर बसेसच्या प्रवेश द्वारावरील फीत कापून आमदारांनी एसटीत बसून प्रवास केला. यावेळी त्यांच्यासोबत नवापूर आधार प्रमुख विजय पाटील सह एस टी महामंडळाचे कर्मचारी उपस्थित होते. नवापूर बस स्थानकावर एसटीचे चित्र असलेला केक आमदार शिरीषकुमार नाईक यांनी कापून एसटीच्या वाढदिवस साजरा केला. प्रसंगी प्रवाशांना पेढे व गुलाब पुष्प देऊन आमदारांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी बोलताना आमदार शिरीष कुमार नाईक म्हणाले की एसटीच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतो. एसटीच्या प्रवास हा सुरक्षित व सुखाच्या प्रवास आहे त्यामुळे प्रवाशांनी एसटीतून प्रवास करावा.चांगल्या बसेसच्या माध्यमातून एस टी महामंडळाने चांगली सेवा प्रवाशांना द्यावी असे सांगितले. यावेळी पोलीस निरीक्षक भाऊसाहेब लांडगे, आधार प्रमुख विजय पाटील, स्थानक प्रमुख रवींद्र जगताप, वाहतूक निरीक्षक श्री नगराळे सहाय्यक वाहतूक निरीक्षक श्री भोये, सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक श्री ठाकरे, ज्ञानेश्वर पवार, आधार लेखाकर श्री गायकवाड आदी उपस्थित होते. एसटीच्या 77 वा वाढदिवसानिमित्त नवापूर बस स्थानक केळीचे खांब व विविध फुलांनी सजविण्यात आले होते. एसटीचे चित्र असलेले मोठी रांगोळी प्रवाशांचे लक्ष वेधून घेत होती. नवापूर एसटी आगाराला आरामदायी व विविध सुविधा असलेल्या नवीन पाच बसेस मिळाल्याने प्रवाशांनी आनंद व समाधान व्यक्त केले आहे.
लालपरीत आहेत विविध सुविधा आणि प्रवाशांना मोबाईल चार्जिंग ही करायला मिळणार..!
नवापूर एसटी आगाराला नवीन पाच बसेस मिळाल्या असून त्या सुरक्षित व आरामदायी आहेत त्यात विविध सुविधा प्रवाशांना देण्यात आलेल्या आहेत. नवापूर आगाराला नवीन पाच बसेस मिळाल्याने प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे. एसटीच्या वाढदिवसाला नवापूर बस स्थानकाला पाच नवीन बसेस मिळाल्याने हा आनंद उत्सवात साजरा करण्यात आला. विशेष म्हणजे लाल परीत मोबाईल चार्जिंग साठी ही सुविधा करण्यात आली आहे. विविध आकर्षक लाईट व आरामदायी बसण्याची व्यवस्था त्यात आहे.
आमदरांनी केला एसटी बस मधून प्रवास.. नवीन बसेसची जाणून घेतली माहिती..
नवापूर बस स्थानकाला नवीन पाच बसेस मिळाल्याने त्याच्या लोकार्पण सोहळा आमदार शिरीषकुमार नाईक यांच्या हस्ते झाला त्यानंतर त्यांनी लालपरी प्रवास करण्याची इच्छा व्यक्त केली. आमदारांना एसटीतून प्रवास करण्याच्या मोह आवरता आला नाही त्यांनी एसटीत बसून प्रवास केला यावेळी त्यांनी आगार प्रमुख विजय पाटील यांच्याशी संवाद साधून एसटी बसेस मधील विविध सुविधांबद्दल माहिती जाणून घेतली.