नवापूर - प्रतिनिधी--
नवापूर पोलीस ठाण्यात नवीन पोलीस निरीक्षक अभिषेक दिलीप पाटील यांनी पदभार स्वीकारला. यावेळी दैनिक पत्रकार संस्थेने अभिषेक पाटील यांची भेट घेऊन त्यांच्या शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत सत्कार केला. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शहरातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन केले.
पोलीस निरीक्षकांची प्रतिक्रिया:
"नवापूर शहरात शांतता आणि सुरक्षितता राखण्यासाठी मी कटिबद्ध आहे. नागरिकांनी कोणताही गैरसमज न ठेवता पोलिसांना सहकार्य करावे. कोणत्याही समस्येसाठी नागरिक निर्भयपणे पोलिसांशी संपर्क साधू शकतात. शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचे पालन केले जाईल, पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की नवापूर शहरातील पोलीस खात्यासंबंधीत काही प्रश्न असतील ते सोडवले जातील. वाढती लोकसंख्या व वाहने लक्षात घेता वाहतूक व पार्किंग समस्या नवापूर शहरात ही आहे यावर नगरपालिकेचे मुख्याधिकारी व व्यापारी संघटना याची बैठक घेऊन त्यावर चर्चा करून उपाययोजना केली जाईल. असे पोलीस निरीक्षक यांनी सांगितले.
दैनिक पत्रकार संस्थेतर्फे स्वागत सत्कार-यांची होती उपस्थितीत
यावेळी दैनिक पत्रकार संस्थेचे अध्यक्ष सुधीर निकम, सचिव महेंद्र जाधव, निलमकुमार पाठक,विनोद सूर्यवंशी, हेमंत पाटील, मंगेश येवले, निलेश पाटील,प्रकाश खैरनार, हेमंत जाधव