नवापूर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी..
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा जागर, समाज बांधव व नागरिकांकडून अभिवादन..
नवापूर प्रतिनिधी
अन्यायग्रस्तांना न्याय देण्याचे कार्य पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी केले. त्यांच्या प्रजाहितदक्ष, राज्यकारभाराचा आदर्श समोर ठेऊन वंचितांच्या कल्याणासाठी काम करणे गरजेचे आहे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी २८ वर्षें राज्यकारभार केला. न्यायदानाची आदर्श व्यवस्था भक्कमपणे उभी केली. केवळ राजकीय नव्हे तर सामाजिक, आर्थिक, धार्मिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात त्यांनी क्रांती घडवली. त्यांचे कार्य व विचार आजही राज्यव्यवस्थेला मार्गदर्शक आहेत.अहिल्यादेवी होळकर यांचे चरित्र, कार्य व आदर्श आज ३०० वर्षांनंतरही तितकेच प्रभावी आणि प्रेरणादायी आहे अशा या महान अहिल्यादेवी होळकर यांची जयंती नवापूर येथे साजरी करण्यात आली त्या अनुषंगाने नवापूर नगरपालिकेचे माजी नगरसेवक विश्वास बडोगे यांच्या राहत्या घरी प्रांगणात राजमाता अहिल्या देवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करत जयंती साजरी करण्यात आली.यावेळी येळकोट,येळकोट जय मल्हार तसेच राजमाता अहिल्यादेवी होळकरांचा विजय असो अशा घोषणा देण्यात आल्या.कार्यक्रमाचा सुरुवातीला राजमाता अहिल्यादेवी होळकरांच्या कार्याची माहिती अशोक रजाळे सर यांनी दिली तर ज्येष्ठ कवी धनगर भीमराव बडोगे (गढरी )यांचे हस्ते प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली होती. यावेळी ज्येष्ठ कवी भीमराव बडोगे (धनगर),विश्वास भीमराव बड़ोगे गोरख'भीमराव बड़ोगे,शानाभाऊ बच्छाव',विजय आनंदा बागुल,अश्विन लांडगे,अशोक रजाळे,शिरसाठ सर,महेंद्र दुर्गादास धनगर,समर्थ विजय बागुल,कावेरी शानाभाऊ बच्छाव,सुनिता शानाभाऊ बच्छाव,सुनिता विजय बागुल,भूमी विजय बागुल
शैला महेंद्र धनगर,सुनिता आश्विन लांडगे यासह शहरातील अनेक धनगर समाज बंधू भगिनी समवेत परिसरातील नागरिक ही उपस्थित होते कार्यक्रमानंतर सुरुची भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.