सार्वजनिक बांधकाम विभाग, नंदुरबारच्या कामकाजाला गती — क्रिडा संकुल, पूल व न्यायालयीन इमारतींसंदर्भात नियोजनबद्ध प्रगती
सार्वजनिक बांधकाम (सा.बां.) विभाग, नंदुरबारच्या वतीने जिल्ह्यातील महत्त्वाच्या पायाभूत सुविधा व विकासकामांची पाहणी व नियोजनात्मक बैठकांचे आयोजन करण्यात आले. कार्यकारी अभियंता श्री. अंकुश अ. पालवे यांनी नुकतीच जिल्ह्यातील विविध ठिकाणी प्रत्यक्ष भेटी देत कामांच्या गती आणि गुणवत्तेचा आढावा घेतला.
जिल्हा क्रिडा संकुलातील कामांना गती:
क्रिडा संकुल येथील प्रगत कामांना भेट देऊन त्यांनी ठेकेदार व संबंधित अधिकार्यांना गुणवत्तापूर्ण काम विहित मुदतीत पूर्ण करण्याच्या सक्त सूचना दिल्या. या ठिकाणी झालेल्या संयुक्त बैठकीस उपविभागीय अधिकारी अंजली शर्मा व जिल्हा क्रिडा अधिकारी सुनंदा पाटील देखील उपस्थित होत्या.
३५ पूलांचे पावसाळापूर्वीचे परीक्षण पूर्ण:
सा.बां. विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या ३० मीटरहून अधिक लांबीच्या ३५ पूलांची पावसाळा पूर्व पाहणी (Pre-Monsoon Inspection) कार्यकारी व अधीक्षक अभियंत्यांनी पूर्ण केली आहे. यामध्ये ८ पुलांचे संरचनात्मक परिक्षण (Structural Audit) करण्याचा निर्णय घेण्यात आला असून कोणताही पूल धोकादायक स्थितीत नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
न्यायालयीन इमारतींच्या दुरुस्तीबाबत महत्त्वपूर्ण बैठक:
२४ जून २०२५ रोजी मा. प्रधान जिल्हा न्यायाधीश, नंदुरबार यांच्या उपस्थितीत न्यायालयीन इमारतींच्या दुरुस्तीविषयक आढावा बैठक पार पडली. यामध्ये रंगरंगोटी, बैठक व्यवस्था, रेलिंग उंची वाढवणे यासारख्या कामांवर चर्चा झाली व धोरणात्मक निर्णय घेण्यात आले.
ज्येष्ठ नागरिक समस्यांबाबत बैठक:
२५ जून २०२५ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात ज्येष्ठ नागरिकांच्या समस्यांबाबत आयोजित बैठकीस श्री. पालवे स्वतः उपस्थित होते, व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दृष्टीने संभाव्य उपाययोजनांची चर्चा झाली.
मा. आमदारांच्या भेटी व मतदारसंघातील कामांचा आढावा:
संपूर्ण विभागीय कामकाजाच्या अनुषंगाने मा. आमदार महोदयांनी कार्यकारी अभियंता पालवे यांची भेट घेतली, व मतदारसंघातील कामांचा आढावा घेतला. संबंधित योजनांची सद्यस्थिती, पूर्णत्वाची टक्केवारी व अडचणी याविषयी माहिती देण्यात आली.
नंदुरबारच्या पायाभूत सुविधांचा दर्जा आणि गती सुधारण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग सातत्याने कार्यरत आहे. विविध यंत्रणांशी समन्वय साधत ही कामे वेळेत, प्रभावीपणे पूर्ण करण्याचा निर्धार विभागाने घेतला आहे.
.
.
.