| राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत मोठी घोषणा झाली आहे. राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी स्पष्ट केलं की, दिवाळीनंतर डिसेंबर-जानेवारी महिन्यांत निवडणुका घेतल्या जाणार आहेत. ही माहिती दिल्यानंतर राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता आहे.
या निवडणुकीत व्हिव्हिपॅट मशीनचा वापर केला जाणार नाही, अशी देखील माहिती आयोगाने दिली आहे. टप्प्याटप्प्याने निवडणुका पार पडणार असून, सध्या त्याची तयारी अंतिम टप्प्यात आहे. नव्या प्रभाग रचनेवर सुप्रीम कोर्टाची संमती मिळाल्याने या निवडणुका घेण्यास मार्ग मोकळा झाला आहे. (Maharashtra Election)
मुंबईत जुन्याच प्रभागांनुसार निवडणूक; इतर शहरांमध्ये चार सदस्यीय प्रभाग :
मुंबई महानगरपालिकेत निवडणूक 227 जुन्या प्रभागांनुसार होणार आहे. आधी महाविकास आघाडी सरकारने हे प्रभाग 236 पर्यंत वाढवले होते. मात्र महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर हे पुन्हा 227 वर आणले गेले. याला आव्हान देण्यात आलं होतं, परंतु सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली, त्यामुळे आता मुंबईमध्ये 227 प्रभाग कायम राहणार आहेत.