अपघातात भंगार व्यवसायिक चालक झाला गंभीर जखमी..
ब्युरो रिपोर्ट विसरवाडी
अपघातात भंगार व्यावसायिक चालक गंभीर जखमी झाला आहे घटना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर घडली आहे. या आठवड्यात लागोपाठ अपघात झाल्याने वाहनचालक व नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे
अज्ञात वाहनाने मालवाहतूक रिक्षाला दिली धडक दिल्याने हा अपघात घडला. ते अज्ञात वाहन कोणाचे त्याच्या शोध घेतला जात आहे.धुळे सुरत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वरील महामार्गवरील अपघातांना आळा केव्हा बसणार असा सवाल पुन्हा पुन्हा व्यक्त होत आहे. ठोस अशी उपायोजना प्रशासन केव्हा करणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. प्रशासनाने फक्त पाहणी करण्याचे नाटक न करता ठोस पावले उचलणे गरजेचे आहे. त्याचे झाले असे की विसरवाडी रिलायन्स पेट्रोल पंप समोर नवापूर येथून मालवाहतूक रिक्षा क्रमांक जी जे१७ वाय ८८३७ यावरून येत असतांना मागून येणाऱ्या अज्ञात वाहनाने मालवाहतूक रिक्षाला जोरदार ठोस दिल्याने रिक्षा पलटी झाली. यात नवापूर च्या रहिवाशी रिक्षाचालक जाकीर हा तरुण या अपघातात गंभीर जखमी झाला.घटनेची माहिती मिळतात नाळीज धाम जगद्गुरु नरेंद्रचार्य महाराज संस्थान रुग्णवाहिकेचे पायलट सुरेश वसावे यांच्या मदतीने विसरवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते .विसरवाडी येथील रिलायन्स पेट्रोल पंप समोरून नंदुरबार बायपास रस्ता तयार करण्यात आला आहे परंतु बायपास हा फक्त नावालाच तिकडे कोणत्याही प्रकारचे बॅरॅकेट किंवा स्टिकर लावण्यात आलेले नाही अशातच स्थानिक नागरिकांना अपघाताना सामोरे जावे लागत आहे. दररोज महामार्गावर लहान मोठे अपघात होत आहे तरीही प्रशासन व महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी त्यांचे ठेकेदार यांना काही फरक पडत नाही. महामार्ग हा अपघात मार्ग ठरला असून चौपदरीकरण रस्ता कामाला कोणाची नाट लागली आहे या विषयावर चर्चा होत असते. अपघात सत्र थांबायला तयार नाही...
