नवापूर प्रतिनिधी
डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरातील समस्यांबाबतचे निवेदन भिम सैनिक व भिम अनुयायी यांच्या तर्फे तहसिलदार दत्ताञय जाधव व पोलिस निरीक्षक शिवाजी बुधवंत,मुख्यधिकारी अविनाश गांगुडे यांना देण्यात आले.
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन तहसिलदार यांना निवेदन दिले.नवापूर नगरपरिषद हद्दीत महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा दर्शनी भागात असून या परिसरात अनेक समस्या आहेत. त्यात परिसरात लावण्यात आलेले वृक्षांच्या अनावश्यक फांद्या आहेत व याच ठिकाणी नागरिकांना बसण्यासाठी बाक ठेवण्यात आलेले आहेत तेथे कधीही या फांद्या हवेने पडून यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही तसेच पुतळ्यावर पडल्यास पुतळा देखील खंडित होऊ शकतो. या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या बाकवर ज्येष्ठ नागरिक, तरुण मंडळी येऊन बसतात त्यात काही लोकं पान गुटखा खाऊन तेथेच थुंकतात आणि तेथे ठेवण्यात आलेले बाकची दिशा देखील बदलविणे आवश्यक आहे जेणेकरुन डॉ.बाबासाहेबांच्या पुतळ्याकडे कोणीही पाठ करुन बसणार नाही. याठिकाणी अनेक व्यावसायिक त्यांचे लॉऱ्या व स्टॉल लावतात आणि या परिसरात शहरातील जाहीरात, शुभेच्छांचे किंवा मृत व्यक्तीचे फलक होर्डिंग बॅनर देखील लावतात. याच ठिकाणी व्यवसायानिमित्त तीनचाकी, चारचाकी वाहने, लॉरी, स्टॉललावणारे व्यावसायिक त्यांचा उरलेला माल ओला व सुका सर्व तेथेच फेकून जातात. परिसरात सुरक्षेच्या दृष्टीने सी.सी.टी.व्ही. कॅमेरे लावणे आवश्यक आहे. दिनांक २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी पंजाब येथील अमृतसर येथे
महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली व तेथे असलेले संविधान शिल्प देखील पेटविण्यात आले. या घटना वारंवार होत असून या घटना यापुढे होऊ नये करीता शासनाने लक्ष देणे आवश्यक असून या बाबी अतिशय गंभीर असल्याने योग्य ती कठोरात कठोर कार्यवाही करण्यात यावी.
याअगोदर देखील पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे परंतु त्याबाबत आजतागायत काहीही कार्यवाही करण्यात आलेली नाही या कारणास्तव आपल्या विभागाकडून या ठिकाणी दोन ते तीन फलक लावण्यात यावे व यावर सूचना देण्यात याव्यात आणि महापुरुषांच्या व्यतिरिक्त तेथे आपल्या परवानगीशिवाय कोणीही व्यक्ती या परिसरात सामाजिक,राजकीय मार्केटींग बाबत बॅनर, फलक, होर्डिंग, प्रचारक बॅनर लावू शकणार नाही याबाबत योग्य कार्यवाही व्हावी. तसेच परिसरातील स्वच्छतेकडे आपल्या विभागाने आवर्जून लक्ष द्यावे. तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या ठिकाणी रात्रं-दिवस एक गृहरक्षक दलाच्या कर्मचाऱ्याची नियुक्ती कायमस्वरुपी करण्यात यावी व आपण केलेल्या कार्यवाही बाबत उलट टपाली कळविण्यात यावे. याबाबत योग्य तो विचार करुन कार्यवाही करावी अन्यथा आगामी काळात आम्हाला आंदोलनाचा पावित्रा घ्यावा लागेल याची नोंद
घ्यावी. तसेच यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास याची सर्वस्वी जबाबदारी संबधित विभागाची राहील असे निवेदना मध्ये म्हटले आहे निवेदनावर भिम सैनिक व भिम अनुयायी चे उमेश पवार,कुणाल नरभवन,विरसिंग कोकणी,अतुल मावचीं,अनुप गावीत,साहिल सैय्यद,रोहन पवार,अभास शेख,बिलाल शेख,राजुव खान,हमजा मकरानी आदीचा सह्या आहेत
.jpeg)