नवापूर येथे रमाई महिला मंडळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती आणि भारतीय बौद्ध महासभा नवापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित माता रमाईच्या 127 व्या जयंतीनिमित्त मालेगाव येथील प्राध्यापिका अलका नागरे यांच्या जाहीर व्याख्यानाच्या कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
जयंती उत्सवाच्या उद्घाटन नवापूर वन विभागाच्या रिजनल फॉरेस्ट ऑफिसर स्नेहल अवसरमल यांच्या हस्ते झाले. त्यांनी प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो असे सांगत माता रमाईच्या जीवन कार्याचा आढावा घेऊन त्यांचे बाबासाहेबांच्या यशस्वी प्रवासातील योगदान यावर भाष्य केले. प्रमुख वक्ते म्हणून बोलताना महिला रत्न पुष्पाताई हिरे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय मालेगाव कॅम्प येथील प्रा. अलका शिवाजी नागरे यांनी जो समाज आपला इतिहास विसरतो तो समाज प्रगती करू शकत नाही या बाबासाहेबांच्या विचारावर जोर देत महाराष्ट्राच्या विकासामागे फुले शाहू आंबेडकर यांचे विचारधारा आहे हे स्पष्ट केले त्याचबरोबर त्यागमूर्ती माता रमाईच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत जीवन कार्याचा आढावा घेत महाराष्ट्राची सांस्कृतिक रमाई म्हणजे त्यागाचा सोहळा आहे,
हालअपेष्टा सहन करण्याचा सोहळा आहे आणि रमाईच्या त्यागाला समाजापर्यंत पोहोचवणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे असे मत व्यक्त केले.कार्यक्रमाच्या अध्यक्ष डॉ. मंदा मोरे यांनी माता रमाई व महानायक भीमराव आंबेडकर यांच्या जीवनातील अनेक अनुभव कथन केले.
रमाई जयंती उत्सव प्रसंगी अतिथींचे स्वागत समाजातील वरिष्ठ भगिनी राजकुवर बाई, किसन नगराळे, शांताबाई नगराळे व सुशीलाताई बिऱ्हाडे यांनी केले. प्रास्ताविक रमाई महिला मंडळाच्या सदस्या सुनिता अमृतसागर यांनी तर पाहुण्यांचा परिचय चारुशीला बर्डे यांनी करून दिला. नवापूर येथील पुष्पवन महिला बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती पूनम बिऱ्हाडे यांनी उपस्थितांचे आभार मानले. डॉ. सुरेखा बनसोडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.याप्रसंगी बुद्धाचार्य दिलीप धिवरे , सुरज मवाडे व शांताबाई नगराळे यांनी रमाईच्या जीवनावर आधारित गीत गायन केले.रमाई जयंती उत्सव यशस्वी करण्यासाठी विरोधी पक्षनेता नरेंद्र नगराळे, माजी नगरसेवक चंद्रकांत नगराळे मनोहर नगराळे, सरदार सर, मिलिंद निकम डॉ.सुनील बोरसे,रमेश पानपाटील यांच्यासह डॉ.अर्चना नगराळे,भारती पानपाटील ज्योती बोरसे, ज्योती महिरे, सुवर्णा हिरे यांनी विशेष परिश्रम घेतले.कार्यक्रमाची सुरुवात बुद्ध वंदनेने तर सांगता सरणत्तयने झाली