नवापूर शहरातुन महामार्ग क्रमांक सहाचे काम ते काम करताना महामार्ग विभागाने शहरात नियोजन शून्य असे काम केले आहे याच्या त्रास या भागातील रहिवाशांना होत आहे. या परिसरातील रहिवाशांना विश्वासात न घेता हे काम होत आहे. मुळात शहरातून महामार्ग होत असल्याने नवापूर शहराच्या चेहरा विद्रूप झाला आहे
इस्लामपुरा,प्रभाकर कॉलनी, दिगंबर पाडवी सोसायटी, सुभाष नगर,भिमनगर या भागातील रहिवासी अनेक वर्षांपासून वास्तव्यास आहेत परंतु शहरातुन महामार्ग जात असल्याने शहरात प्रवेशासाठी कोणत्याही प्रकारची सोय नसल्यामुळे आज या भागातील रहिवाशांनी चक्क तीन तास उड्डाण पूलाचे कामबंद आंदोलन केले.यात महिला वर्ग, पुरुष,युवक व लहान मुलांच्या मोठ्या प्रमाणात उपस्थित होते गेल्या तीन चार दिवसांपूर्वी एका गरोदर महिलेला बोगदा नसल्याने तीला आपला जीव गमावला लागला होता यामुळे संतप्त नागरिकांनी उड्डाण पूलाचे काम चक्क तीन तास बंद पाडले होते. मात्र रहिवाशांच्या मागणीकडे दुर्लक्ष होत असल्याने या भागातील रहिवासी संतप्त होऊन आक्रमक झाले आहे. यावेळी विरोधी पक्षनेते नरेंद्र नगराळे,माजी उपनगराध्यक्ष फारुक शहा,प्रकाश ब्राम्हणे,आनंदा आतारकर,शिरसाठ पेटर,सलीमखालीक काकर,रमजानशहा गणी शहा आदी सह रहिवासी महिला पुरुष उपस्थित होते. यावेळी पोलिसांच्या चोख बंदोबस्त होता. या परिसरातील आंदोलन तीव्र होण्याची चिन्ह दिसत आहे.