Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

heaing logo

heaing logo

जून्या आठवणीने अऩ संगीत नृत्याने रंगलेला..श्री गोविंद उर्फ दिलीप कुळकणींचा 71 वा जन्म़ दिवसांचा अनोखा सोहळा…

 नंदुरबारवासीय…. पुण्यात स्थित प्रसिध्द़ व्हायोलिन वादक तथा सरस्वती संगीत विद्यालयाचे संचालक श्री दिलीप कुळकणी सरांच्या  ७१ व्या वाढ दिवसानिमित्त़ आयोजित   संगीत रजनी व सत्कार समारंभ ब्राह्मणवाडीत  मोठया थाटात संपन्न झाला. शनिवारी ८ फेब्रूवारी रोजी दिलीपजी कुळकर्णी यांचे पुतणे अभिषेक कुळकर्णी यांच्या शास्त्रीय गीत गायनाने अन पुण्यातील अफसरभाई खान यांच्या नृत्यांने कार्यक्रमात चांगलीच रंगत आणली. ब्राह्मण वाडीत दोन दिवस चाललेल्या सांस्क़ृतिक कार्यक्रमाचा नंदुरबारकर रसिकांनी मनमुराद आनंद लुटला.पुण्यापेक्षाही नंदुरबारकर रसिकांची मिळणारी उत्तम दादमुळे पुण्यातील कलावंत भारावले नसते तर नवलच…
सरांच्या शिष्यांनी कृतज्ञता भाव व्यक्त़ करण्यासाठी आयोजिलेला
अफसर भाई खान यांच्या दोन शिष्यांही नृत्यासाठी सज्ज़ झाल्या होत्या…
त्यांच्या दोन शिष्या समृध्दी पुजारी आणि श्रेया पटणी यांनी देखील छान नृत्य़ सादर केले.
अफसरभाई खान हे पुण्यातील उत्त़म नृत्य़ कलाकार..मुस्लीम असूनही गणेश स्त्रोत त्यांचे तोंडपाठ …गणेशाची वंदना म्ह़णण्यात त्यांचा  हात कुणी धरणार नाही..
बनारस घराण्याचे ते नर्तक.. कथ्थ़क नृत्यात त्यांनी प्राविण्य़ मिळवलेले..नवी दिल्लीत पदविकापर्यंत शिक्षण घेतले..वडिलांकडून आलेला बनारस घराण्याचा वारसा  समृध्दीपर्यंत नेऊन ठेवण्यात त्यांची मेहनत वाखाणण्याजोगी आहे. नृत्याचे अर्थ सांगत त्यांनी अनेक बंदीशी सादर केल्या..
कलावंतांशी जुळवाजुळव करीत त्यांना नाकेनऊ आले खरे पण त्यांनी मिश्कील शब्दात त्यांचे समर्थनही केले..ही आमची 'मिलीजूली' सरकार म्ह़णत त्यांनी आपल्या हजर जबाबीपणाचा आणि पुणेकर असल्याची झलक दाखवून दिली. माथ्यावर लाल टिळा..केस वाढलेले..अफसरभाई नावामुळे ते मुस्लीम वाटले.. देहबोली पुर्णपणे हिंदूचीच…कलाकाराला कुठलीच जात, धर्म नसतो..हेच अफसरभाईंनी दाखवून दिले…उस्ताद जाकीरभाई,मोहम़मद रफी साहेब,शहनाई वादक बिस्मील्ला खान यांच्याही आयुष्यात कधी धर्माचा लवलेश दिसला नाही..बिस्मील्ला खान म्हणत़,संगीत एक ऐसा माध्यम़ है..जहा सात सुर मिलते है..चाहे पुरब हो चाहे पश्चिम..हर कोने मे..सप्त़ सुरमेही संगीत है..पुरा संसार इस सात सुरोंमे बंधा गया है..चाहे कुराण..चाहे गीता..चाहे बायबल…चाहे ग्रंथसाहीबा…अलग अलग माध्यमसे धर्मकी परीभाषा कही जाती है..लेकीन संगीत की एकही भाषा है..वो है सप्त़ सुर..सारेगमपधनि…..
त्यांच्या या उक्तीची झलक अफसरभाईंमध्ये पाहायला मिळाली..
समृध्दी आणि श्रेया यांचे नृत्य़ पाहून संगीताचे श्रेय कुठल्या गुरुंना दयावे,असा प्रश्ऩ पडावा…एवढे समृध्द़ नृत्य़ या  शिष्यांनी सादर केले..
 तबला वादक शंकर कुचेकर, पखवाज वादक भुषण गुरव तसेच अफसर भाई यांची त्रिपल जुगलबंदी अफलातूनच होती…
नृत्याच्या नुपुरांच्या आवाजाला तोडीस तोड तबला आणि पखवाजने दिल्याने श्रोते मंत्रमुग्ध़ झाले…कान आणि डोळे तृप्त़ झाले…वाह वाह..च्या आवाजाने ब्राह्मणवाडी दणाणली..डॉ अंधारे,डॉ सी डी महाजन यांच्यासह अनेक कानसेनांचे कान तृप्त़ झाले…
पुण्यात स्थित व धुळे निवासी अभिषेक अशोक कुळकर्णी यांनी दिड तास शास्त्रीय संगीतावर आधारीत गाण्यांची मेजवानी सादर केली. या गीतांना हामौनियमची साथ हर्षद वडजे, तबला योगेश संदानशिव,पखवाज भुषण गुरव, टाळ उमेश दिक्षीत आणि महेश भट यांनी दिली.. त्यांना दिलीप कुळकर्णी सर यांच्या पुत्राचे नाव केदार..त्याचे सात वर्षापूर्वी नंदुरबारात अकाली मृत्यू झाला..त्याची आठवण म्हणून केदार राग सर्वात आधी आळवला गेला…त्यावेळेस पृत्राच्या आठवणीने दिलीप कुळकर्णी यांचे डोळे पाणावले..चष्म्याची फ्रेम बाजूला सारत कुळकर्णी सरांनी पाणावलेले डोळे पुसले ..आणि जणू काही झालेच नाही अशा अविर्भावात गाण्यात तल्लीन झाले..गोरख कल्याण,मारु बिहाग या रागांवर गाणी सादर करण्यात आली..त्यानंतर 'यासाठी केला होता अट़टाहास 'तसेच 'अमृताहूनी गोड,नाव तुझे देवा'…या भैरवीनें कार्यक्रमाची सांगता झाली ..
दुसऱ्या दिवशी अर्थात रविवारी सकाळी ब्राह्मणवाडीत श्री दिलीप उर्फ गोविंद सरांचा सत्काराचा कार्यक्रम संपन्ऩ झाला…कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डीआर हायस्कूलचे माजी चेअरमन टेंभेकरसर हे होते तर प्रसिध्द़ ह़दयरोग तज्ज्ञ डॉ दीपक दादा अंधारे हे प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित होते..सोबत मुलगी कल्याणी व पत्नी सविता हया देखील व्यासपीठावर उपस्थित होत्या…दोन्ही दिवसाचे मोजक्या शब्दातले सुत्रसंचालन महेश भट यांनी केले…
खरे तर सुत्रसंचालनाची चोख जबाबदारी महेश भट यांनी बजावली…रणजीत राजपूत अर्थात माझ्या मनोगताने कार्यक्रमाला सुरुवात झाली… चारुदत्त़कळवणकर,सारंगबुआ रोकडे,सुनिताताई चव्हाण, श्री राम दाऊतखाने,महेश भट, शिक्षक दिनेश वाडेकर,ज्येष्ठ़ शिक्षक चौधरी,विंचूरकर, डॉ दिपकदादा अंधारे, भरत पाटील,निवृत्त़ शिक्षक तांबोळीसर यांच्यासह १५ हून अधिक मान्यवरांनी आपल्या शैलीत मनोगत व्य़क्त़ केले.सत्काराला उत्तर देण्यापुर्वी त्यांचे मोठे बंधू निशब्द़ होत रडू लागले…त्यामुळे व्यासपीठावरील सर्वच मान्यवरांचे डोळे केदार च्या आठवणींने पुन्हा पाणावले…यावेळी मात्र वातावरण चांगलेच गंभीर झाले होते.
अभिषेक कुळकर्णी यांनी आभाराबरोबरच आपल्याला दिलेल्या संस्काराची आठवण करुन दिली..त्यानंतर तात्काळ सुरुची भोजनाचा आश्वाद घेण्यात आला..
दिलीप कुळकर्णी हे रागीट आहेत…हळवे आहेत,. ते इंत्यभूत माहिती ठेवतात..निधन,वाढदिवस यांच्या तारखा त्यांना चांगल्याच माहिती असतात..पुण्यात राहूनही ते नंदुरबारची माहिती ठेवतात..ते शाळेत संगीत कुळकर्णी नावाने ओळखले जात..काहींच्या मते ते झी टीव्ही तर काहींना ते बीबीसी लंडन भासतात…
त्यांनी महेश भट यांना घडवले..आजूबाजूला दारु सट़टयांची दुकाने असतांना माझ्या आयुष्यात त्याचे व्यसन लागले नाही,याचे श्रेय कुळकर्णी सरांना जाते,असे एक शिष्य़ सांगून गेला तेव्हा टाळयांची दाद मिळाली..गोविंद हे दिलीप सरांचे नाव आहे ,हे मला या क्षणी कळाले असे डॉ अंधारे दादा यांनी सांगितले…
त्यांना डायरी लिहायची सवय आहे..असे महेश भट यांनी सांगितले… प्रा धनंजय वाघ म्हणाले,माझ्या मुलीला सरांनी जे शिकवले ते मी कधीच विसरु शकणार नाही..रात्री अडीच वाजेपर्यंत सर माझ्या मुलीला संगीत शिकवायचे..त्यांनी मनापासून संगीताची विद्या दिली…मी तरुणपणी संघर्ष करीत असतांना माझ्याकडून  फी कधी घेतली नाही..
गरीबांना सहकार्य करणारे व्यक्तिमत्व म्हणजे कुळकर्णी सर…अशा शब्दात अनेक शिष्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या…भरतभाई पाटील यांनी तर कार्यक्रमात गौप्यस्फोट केला. सरांची आणि माझी अर्ध्या मिनिटाची भेट हीच सरांच्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट ठरली..
लांबलचक चाललेला कार्यक्रम असतांनाही तो कंटाळलेला वाटला नाही…सुरुची भोजनाच्या वेळेस सर्वच न सांगता पटापट बसले…वाढपींनी कुठल्याही आदेशाविनाच वाढायला सुरुवात केली. दिड वाजण्याच्या सुमारास सर्वांना जोरदार भुक लागली होती…अशातच थाळी पुर्ण होण्याआधीच सर्वांनी ताव मारायला सुरुवात केली.ताटातील एक वाटी मात्र रिकामीच होती..तेव्हा हळूच श्रीराम म्हणाला, श्रीखंड येतेय..थोडे सावकाश होऊ दया…जेवण संपण्याच्या दोन मिनिटाआधीच श्रीखंड आले….आणि कार्यक्रमाचा शेवट गोड झाला…आपल्या सत्काराला उत्तर देतांना दिलीप कुळकर्णी सर म्हणाले, मी सात वर्षापुर्वी पुण्यात स्थायीक झालो..पुण्यात मी केवळ देहाने राहतो ..मन अजूनही नंदुरबारातच रमते….तिथेही गोतावळा निर्माण केला…अफसरभाईसारखे मित्र मिळाल्याने मी आनंदात आहे…चिरंजीव केदार आणि बंधू अशोक या दोघांच्या मृत्यूचे शल्य़ दिलीप कुलकर्णी सरांनी कठोर मनाने  पचवले..त्यांनी निरोगीमय, उदंड असे आयुष्य़ जगावे, आपल्या आयुष्याची शतायुषी पार करावी,आणि एकशेएकवा जन्म़ दिवस याच ब्राह्मणवाडीत साजरा करण्याची संधी आम्हाला दयावी, या शिष्यांसह हितचिंतकांच्या शुभेच्छांनी कार्यक्रमाची सांगता झाली….तेही एक लाख 25 हजार रुपयांची गुरुदक्षणा देत...
रणजीत राजपूत, नंदुरबार  ( भ्रमणध्वनी: ९४२०३७५२०४

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.