नागरिकांनी सामाजिक सलोखा जपण्याचे उद्देशाने नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे जिल्हयातील विविध तालुक्यातील स्पर्धकांसाठी जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धा- 2025 चे आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धा जिल्हा पोलीस वसाहत मैदान,नंदुरबार येथे दि. 15/02/2025 ते 16/02/2025 दरम्यान पार पडली. सदर स्पर्धेत एकुण 8 संघानी सहभाग नोंदविला होता.
त्यामध्ये 1. पोलीस अधीक्षक कार्यालय संघ 2. पोलीस मुख्यालय संघ 3. नंदुरबार शहर संघ 4. शहादा संघ 5. नवापूर संघ 6.अक्कलकुवा संघ 7. धडगाव संघ 8. तळोदा संघ यांनी सहभाग घेतला होता.सदर स्पर्धेचे दि.15/02/2025 रोजी सकाळी 08.00 वाजता पोलीस अधीक्षक श्री. श्रवण दत्त. एस यांचे हस्ते उद्घाटन करण्यात आले होते. यावेळी वर नमुद संघांनी आपआपले संघांना जिंक विण्यासाठी आपल्या उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन दाखविले.दि. 16/02/2025 रोजी अक्कलकुवा व नवापूर संघात अंतिम सामना खेळला गेला. त्यामध्ये अतितटीच्या सामन्यात नवापूर संघाने अक्कलकुवा संघावर विजय प्राप्त करीत क्रिकेट चषकावर आपले नाव कोरले. तर अक्कलकुवा संघ उपविजेता ठरला. सदर स्पर्धेत "मॅन ऑफ द सिरीजचा " मानकरी ठरला तो नवापूर संघाचा डॅनियल गावीत, तर "मॅन ऑफ द मॅचचा "पुरस्कार हा शशिकांत पवार, नवापूर यास मिळाला. स्पर्धेत आपले उत्कृष्ट गोलंदाजीचे आधारे हॅट्रीक घेणा-या अक्कलकुवा संघाच्या पिंटू मकरानी यास सन्मानित करण्यात आले. स्पर्धेत पंच म्हणून काम पाहणारे राकेश वसावे,सुनिल मोरे, हारसिंग पावरा, योगेश सोनवणे, ईश्वर गावीत तसेच स्पर्धेवेळी समालोचन करणारे आनंदा मराठे व प्रदिप डोळझाके यांना देखील यावेळी सन्मानित करण्यात आले. स्पर्धेतील विजेत्या नवापूर संघास रोख 12,000/- रुपये तर उपविजेत्या अक्कलकुवा संघास रोख 8,000/- रुपयांचे पारितोषिक देण्यात आले.
सदर स्पर्धा पोलीस अधीक्षक श्री. श्रवण दत्त एस, अपर पोलीस अधीक्षक श्री. आशित कांबळे, नंदुरबार उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. संजय महाजन यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. हेमंत पाटील, पोलीस वेल्फेअर पोलीस निरीक्षक श्री.विवेक पाटील, वाचक पोलीस निरीक्षक श्री. हेमंत पाटील, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री.अमितकुमार मनेळ व इतर पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे सहकार्याने पार पडला.