Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

heaing logo

heaing logo

प्रमुख मागण्यांसाठी आदिवासी संस्कृत रक्षक उमेश मंजी गावीत यांचे तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण

उपोषणाची दखल अद्याप घेतलेली नाही उमेश गावित यांची माहिती..!!

नवापूर तालुक्यातील ११६ ग्रामपंचायतींच्या हद्दीत शेकडोंच्या संख्येने कोट्यावधी रुपयांच्या अधिकृत अथवा अनधिकृतरित्या बांधण्यात आलेल्या टोलेजंग चर्चची माहिती केंद्रिय माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अन्वये दिनांक ०९ डिसेंबर २०२४ रोजी माहितीची मागणी केली होती. पण ११६ ग्रामपंचायतीच्या ग्रामविकास अधिकारी तथा ग्रामसेवकांनी माहिती‌ आजता गायत दिलीच नसल्यामुळे सदर माहिती मिळेपावेतो दिनांक १२.०२.२०२५ पासून शांततेच्या मार्गाने व कायद्याच्या चौकटीत राहून तहसिल कार्यालया नवापूरच्या समोरील असलेल्या मोकळ्या जागेत धरणे आंदोलनाला नवापूर तालुक्यातील भांगरपाडा या गावचे आदिवासी रुढी परंपरा तथा आदिवासी संस्कृत रक्षक उमेश मंजी गावीत हे बसलेले असून धरणे आंदोलनाचा सहावा दिवस असून सदर माहिती देणेत आली नाही तर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी दिनांक १७.०२.२०२५ पासून नाईलाजस्तव न्याय हक्कासाठी आंदोलनस्थळी आमरण उपोषण करत असल्याचे माहिती त्यांनी बोलतांना दिले. उमेश गावित म्हणाले की प्रमुख मागण्या पैकी  चर्चचे बांधकाम ग्रामपंचायतीच्या गावठाण जमीनीत करण्यात आले असल्यास त्याबाबत‌ सविस्तर माहिती आपल्या सही शिक्क्यानिशी मिळावी.सदर कामी ग्रामपंचायतीने ग्रामसभेचा ठराव दिल्याबाबतची सविस्तर माहिती मिळावी. चर्चचे बांधकाम पक्के असल्याबाबत नमुना नंबर ८-अ उतारा देण्यात यावा.वास्तु तज्ज्ञाकडून काढलेला नकाशा व नगर रचना (T.P.) चा परवानगी असल्याबाबत नकाशाची छायांकित प्रत मिळावी. नगर रचना कार्यालय, नंदुरबार यांनी बांधकामाबाबत दिलेल्या नियम व अटींची प्रत तसेच ना-हरकत दाखला बाबत सविस्तर माहिती मिळावी. चर्चचे बांधकाम खाजगी शेतजमीनीत केले असल्याबाबत शासनाचे बिनशेती (N.A.) आदेशाची छायांकित प्रत मिळावी.सदर कामी जमीन मालकाने दिलेल्या संमतीबाबतची सविस्तर माहिती मिळावी. नगर रचनाकार नंदुरबार यांनी बांधकामाचा वास्तुतज्ज्ञाचा नकाशा व ना-हरकत दाखल्याची प्रत आपल्या सहीशिक्क्यानिशी मिळावी या प्रमुख मागण्यांसाठी मी उपोषण करीत आहे उपोषणाला सर्व गावपाड्यातील लोकांच्या चांगला पाठिंबा मिळत असून उपोषणाची दखल अद्याप घेतलेली नसल्याचे उमेश गावित यांनी यावेळी बोलताना सांगितले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.