मौजे पाटी बेडकी येथील मंजूर असलेले 33/11 के. व्ही. विद्युत केंद्राचे काम पर्यायीजागेवर बांधकाम करणे व वडखुट फिडरवरील शेतीपंपाचा विजपुरवठा सुरळीत करणे बाबतचे निवेदन महाराष्ट्र प्रदेश आदिवासी काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष आर सी गावीत यांनी जिल्हाधिकारी यांना दिले आहे त्यांनी निवेदना मध्ये म्हटले आहे की नवापूर तालुक्यातील मौजे पाटीबेडकी येथे वडखुट फिडरसाठी 33/11 के. व्ही विद्युत केंद्र मंजूर झालेले असून कामालाही सुरुवात झालेली होती परंतू काही गावकऱ्यांच्या विरोधामुळे सदर 33/11 के. व्ही. विद्युत केंद्राचे काम रखडलेले आहे. त्या जागी बांधकाम करण्यास गावकऱ्यांचा विरोध आहे.सदर केंद्र बांधकामासाठी पर्यायी जागा देण्यास शेतकरी तयार आहे.तरी विद्युत विज वितरण कंपनी सदर केंद्राची मंजूरी रद्द न करता पर्यायी जागेवर बांधकामासाठी शासनाच्या सर्व अटी नियमानुसार चाचणी करुन सदर Sub- Station ची जागा निश्चित करावी व त्या ठिकाणी बांधकाम झाल्यास वडखुट फिडरवरील शेतकऱ्यांचा विजेचा प्रश्न सुटणार आहे. म्हणून सदर 33/11 के. व्ही.
विद्युत केंद्राची मंजूरी रद्द न करता पर्यायी जागेवर सदर केंद्राची उभारणी करावी तसेच वडखुट फिडरवर आता पासूनच लोड शेडींग चा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. कमी दाबाचा विज पुरवठा केला जात असल्यामुळे शेतकऱ्यांचे शेती पंप चालत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे पिकांचे मोठे नुकसान होत आहे. म्हणून वडखुट फिडरवरील विज पुरवठा सुरळीत करण्यात यावा व मौजे पाटीबेडकी येथील 33/11 के.व्ही. विद्युत केंद्राचे काम पर्यायी जागेवर सुरुवात करण्यात यावी अन्यथा शेतकऱ्यांमार्फत मोठे आंदोलन केले जाईल व होणाऱ्या परीणामास सर्वस्वी शासन जबाबदार राहील याची नोंद घ्यावी.असे निवेदना मध्ये म्हटले आहे निवेदनावर महाराष्ट्र प्रदेश आदिवासी काँग्रेस जिल्हाध्यक्ष आर. सी. गावीत,अँड रोशन गावीत, किसन गावीत,शमुवेल गावीत, शिवाजी गावित ,दनिकाल गावित, रमेश गावीत,मान्या गावीत,रतिलाल गावीत,रमेश गावीत,केशव गावीत,विपुल गावीत,राहुल गावीत,वंत्या गावीत,सेगा गावीत,प्रमेश गावीत सह असंख्य शेतकरी बांधवाचा सह्या आहेत.