शहादा येथील खाजगी व्यापारी गाळ्याना भीषण आग,जीवित हानी टळली
February 10, 2025
0
शहादा शहरातील प्रकाशा रस्त्या लगत खाजगी व्यापारी दुकानांना भीषण आग लागली असून या आगीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या आगीत प्रकाशा रस्त्यावरील आठ ते नऊ दुकाने जळून खाक झाली आहेत. आगीत चारचाकी वाहनांचे गॅरेज, मंडप साहित्यांची दुकान , इलेक्ट्रिक दुकान , साऊंड सिस्टम अनेक दुकाने होती या परिसरात आग लागल्यानंतर एकच धावपळ उडाली असता घटनास्थळी तातडीने शहादा नगरपालिका अग्निशामन दल पोलीस प्रशासन महसूल विभाग दाखल झाले होते .आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशामन दलाची शर्तीचे प्रयत्न केले असून तीन ते चार तासानंतर आज आटोक्यात आली. आगीत 50 ते 60 लाख रुपयांचं नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या भीषण आगीत मोठा ट्रक जळून खाक इतर लहान मोठे चार चाकी वाहन देखील जळाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.आग नेमकी कशामुळे लागली हे अद्यापही अस्पष्ट आहे.