दि नवापुर एज्युकेशन सोसायटी द्वारा संचालित श्रीमती एस एम चोखावाला लिटल एंजल्स अकॅडमीच्या मा. मुख्याध्यापिका डॉ. सिमरन अमोल दिवटे ह्या दिनांक 8 फेब्रुवारी 2025 रोजी पुणे येथे एज्युकेशन एक्सलन्स कॉन्क्लेव्ह भव्य द्वारा आयोजित भव्य समारंभात मा.श्री गगनदीप सिंह डायरेक्टर एक उपदेश मीडिया.यांच्या हस्ते स्वामी विवेकानंद राष्ट्रीय प्रिन्सिपल अवॉर्ड ट्रॉफी व सर्टिफिकेट देऊन गौरवण्यात आले.तसेच संस्थेद्वारा आयोजित वार्षिक मीटिंगमध्ये शाळेच्या मा. कार्यकारी अध्यक्षा श्रीमती शीतलबेन वाणी यांनी व संस्थेचे मा. अध्यक्ष श्री विपिनभाई चोखावाला तसेच इतर सर्व माननीय संचालकांच्या समक्ष शाल व श्रीफळ देऊन पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार केला.शाळेच्या गेल्या वीस वर्षाच्या प्रगतीत सिंहाचा वाटा असणाऱ्या डॉ.सिमरन अमोल दिवटे मॅडम या विद्यार्थ्यांचा सर्वांगीन विकास, शाळेची नेत्र दीपक प्रगती तसेच शाळेच्या भौतिक प्रगतीसाठीची दूरदृष्टी व शिक्षक व विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढवण्यास त्यांचा नावलौकिक आहे.
यापूर्वी देखील त्यांना विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.त्यात प्रामुख्याने इंडियन नॅशनल ओलंपियाड द्वारा बेस्ट प्रिन्सिपल अवॉर्ड, सौ प्रतिभा शुक्ला मिनिस्टर ऑफ वुमन वेल्फेअर द्वारा फाईव्ह स्टार रेटिंग अवॉर्ड,डॉक्टर एस राधाकृष्णन आदर्श शिक्षा सन्मान तसेच सीबीएससी द्वारे विविध पदे भूषवण्याचा देखील सन्मान त्यांना देण्यात आला आहे