बिरसा क्रांती दल नंदुरबार जिल्ह्याच्या उपजिल्हाध्यक्षपदी नवापूर तालुक्यातील नांदवण तालुका नवापूर येथील सुनिल गमण गावीत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नंदुरबार जिल्हाध्यक्ष बहादुर सिंह गेमजी वळवी यांनी त्यांना नियुक्तीपत्र दिले असून आदिवासी समाजाच्या सर्वागिण प्रगतीसाठी, आत्मसन्मानासाठी, अस्तित्व, अस्मिता व संरक्षणा साठी आणि शिस्त, शिक्षण व संस्कृती संवर्धनासाठी एका वैचारिक व कॅडरबेस संघटनेची आवश्यकता होती ही आदिवासी समाजाची गरज लक्षात घेवुन बिरसा क्रांती दल या कॅडरबेस वैचारिक संघटनेची निर्मिती झालेली आहे.या संघटनेत आपण सहभागी होवुन काम करण्याची इच्छा प्रदर्शित केल्यामुळे आपली नंदुरबार जिल्हयाच्या नंदुरबार उपजिल्हाध्यक्ष या पदावर नियुक्ती करण्यात येत आहे.आपण संघटनेचे वैचारिक व संघटनात्मक शिस्त पाळुन काम करावे हि अपेक्षा जिल्हाध्यक्ष यांनी नियुक्ती पत्रात व्यक्त केली आहे.