धुळे तालुक्यातील देऊर येथील मूळ रहिवासी असलेला आणि मर्चंट नेव्ही मध्ये कार्यरत असलेला यश देवरे हा तरुण ओमानच्या सागरात बेपत्ता झाला असून अद्याप शोध लागलेला नसल्याने कुटुंबीयांनी चिंता व्यक्त केली आहे...देऊर येथील यश अविनाश देवरे हा तरुण मर्चंट नेव्ही मध्ये असून ठाणे येथील स्वराज सर्विस प्राइवेट लिमिटेड मध्ये तो ओएस पदावर कार्यरत आहे. तो सौदी अरेबियातील ओमन येथे गेला असताना दिनांक 28 जानेवारी रोजी त्याचे आणि कुटुंबीयांचे शेवटचे बोलणे झाले होते, मात्र त्यानंतर त्याच्याशी कुटुंबीयांचा कुठलाही संपर्क झालेला नाही... तसेच 29 जानेवारीला दुपारी 2 वाजता संबंधित जहाज कंपनीने देवरे कुटुंबीयांशी संपर्क साधून यश हा चालत्या जहाज मधून पाय घसरून पडून समुद्रात पडून बेपत्ता झाल्याची माहिती कंपनीने दिली. मात्र तब्बल बारा दिवस उलटून देखील अद्यापही यश चा शोध लागला नसून कुटुंबीयांनी चिंता व्यक्त केली असून याबाबत ठाणे येथील नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार देखील दाखल करण्यात आली आहे. यश देवरे याच्या कुटुंबीयांनी कंपनीशी संपर्क साधला असता त्यांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. तसेच गेल्या काही दिवसांपासून संपर्क क्रमांक देखील बंद करण्यात आला आहे. यामुळे गेल्या आठवड्यापासून देवरे कुटुंबीय नातलग आणि त्याचे निकटवर्तीय यश च्या शोधात असून एमटी अथेना1 हे जहाज ओमानहून गुजरातच्या अलंग येथे या आठवड्यात येणार होते मात्र हे जहाज किती वाजता येईल याची माहिती यंत्रणे कडून दिली जात नसल्याची देवरे कुटुंबियांनी तक्रार केली आहे