ऐसा चाहू राज मै जहा मिले सबन को अन्न छोट बडो सम बैसे रविदास रहे प्रसन्न.याच मनी प्रमाणे या पृथ्वीतलावरील प्रत्येकाला अन्न मिळालं पाहिजे. प्रत्येक जण समाधानी झाला पाहिजे. अशा उच्च विचारांची शिकवण संत रविदासजी महाराज यांनी दिली.संत शिरोमणी गुरु रविदासजी महाराज 15 व्या शतकातील एक महान संत, कवी, तत्त्वज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यांचा जन्म उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे माघ पौर्णिमेला झाला.त्यांच्या अनुयायांसाठी हा दिवस विशेष महत्त्वाचा आहे.
रविदासजींनी आपल्या जीवनात सामाजिक समता, बंधुत्व आणि भक्तीचा संदेश दिला.त्यांनी जाति व्यवस्थेचा विरोध करून मानवतेचा संदेश दिला.त्यांच्या रचनांमध्ये ईश्वरभक्ती, मानवतावाद आणि सामाजिक न्याय यांचा समावेश आहे.
रविदासजींचे शिष्य आणि अनुयायी भारत भर आहेत, आणि त्यांची जयंती माघ पौर्णिमेला मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. त्यांच्या शिकवणी आजही आजही समाजाला प्रेरणा देतात. त्या अनुषंगाने आज श्री शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात संत रविदास जी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. त्यानिमित्त शाळेत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.सर्वप्रथम प्राचार्या कमल कोकणीउपमुख्याध्यापक ए. एन.सोनवणे ,उपप्राचार्य राजेंद्र कुलकर्णी, पर्यवेक्षक गजेंद्र सूर्यवंशी, पर्यवेक्षक जगदीश वाघ यांनी प्रतिमेचे पूजन केले .पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर सर्व शिक्षक व शिक्षकेतर बंधू-भगिनी यांनी प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी मोठ्या संख्येने माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर बंधू-भगिनी उपस्थित होते