भारतात दरवर्षी २८ फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिवस चंद्रशेखर वेंकट रामन यांच्या सन्मानार्थ साजरा केला जातो. विज्ञानाच्या फायद्यांबद्दल समाजात जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि वैज्ञानिक वृत्ती निर्माण करण्यासाठी 'राष्ट्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान परिषद' आणि 'विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या' अंतर्गत राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो.
रामन इफेक्टचा शोध लागल्याने राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो. या शोधाची घोषणा भारतीय शास्त्रज्ञ सर चंद्रशेखर वेंकटरामन यांनी २८ फेब्रुवारी १९२८ रोजी केली होती. या शोधाबद्दल त्यांना १९३० मध्ये नोबेल पारितोषिक देण्यात आले होते. आज सर्वत्र २८ फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जात आहे त्या अनुषंगाने नवापूर येथील श्री शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला. प्रयोग शाळेत मुख्याध्यापिका श्रीमती कमल कोकणी उपमुख्याध्यापक ए .एन. सोनवणे ,पर्यवेक्षक गजेंद्र सूर्यवंशी आणि विज्ञान व गणित विषय शिकवणारे शिक्षक यांनी भारतीय वैज्ञानिक सी व्ही रमण यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केला आला व सर्वांनी यावेळी अभिवादन केले.राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या या कार्यक्रमासाठी विज्ञान परिचर प्रशांत मदन पाटील यांनी तसेच विज्ञान शिक्षकांनीही परिश्रम घेतले. प्रसंगी विज्ञान शिक्षकांनी विद्यार्थ्यांना विज्ञानाचे महत्त्व स्पष्ट करून दिले तसेच विज्ञानामुळे आपण देशाची प्रगती कशाप्रकारे करू शकतो त्याचेही स्पष्टीकरण दिले. यावेळी अर्चना बिरारी, प्रमिला शेवाळे, विद्या वळवी, नीलकंठ बागुल, परशु पाटील, कल्पेश थेटे,प्रशांत ठाकरे, विकास पाटील,उपेंद्र पाटील, गोपाळ पाटील, गोविंदा कोळी यावेळी उपस्थित होते.