:- आजपासून बारावीच्या परीक्षेला सुरुवात होत आहे. नंदुरबार जिल्ह्यात बारावीच्या परीक्षे साठी 28 केंद्रांची व्यवस्था करण्यात आली असून जिल्ह्याभरातून 17 हजार 611 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. कॉपीमुक्त परीक्षा पार पाडण्यासाठी परीक्षा केंद्रांवर ड्रोन द्वारे, सीसीटीव्ही द्वारे व ज्या ठिकाणी सीसीटीव्ही नसतील त्या ठिकाणी मोबाईल द्वारे चित्रीकरण करण्यात येणार असून कॉपी प्रकरण आढळल्यास संबंधित पर्यवेक्षक, केंद्र संचालक व विद्यार्थीला जबाबदार धरले जाणार आहे. यासह परीक्षा केंद्राच्या 200 मीटरच्या आत झेरॉक्स सेंटर तसेच 100 मीटरच्या आत पालकांना येण्यास बंदी करण्यात आली आहे कॉपीमुक्त परीक्षा घेण्यासाठी प्रशासनाच्या वतीने सम्पूर्ण तयारी करण्यात आली आहे. एकंदरीत आज पासून सुरू होत असलेल्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांमध्ये देखील उत्सुकता पाहायला मिळत आहे.
आजपासून सुरू होत असलेल्या बारावी बोर्डाच्या परीक्षेसाठी केंद्रांवर असणार ड्रोन, सीसीटीव्हीचा वॉच
February 11, 2025
0