बेरीकेट्स नसल्यामुळे अवजड वाहनांच्या सुळसुळाट-अपघात व रस्ते खराब होण्याच्या मार्गावर.. दोन नंबरीना सुगीच्या मार्ग..
नवापूर- शहरातील धडधड्या कडून शास्त्री नगरकडे येणाऱ्या रस्त्यावर लोखंडी रॉडने बॅरिकेटिंग करण्यात आली होती.
परंतु गेल्या एक महिन्या आधी अज्ञात वाहनाने सदर लोखंडी बॅरिकेट्स तोडून टाकले. त्यामुळे शास्त्रीनगर भागातील नागरिकांना अवजड वाहनांचा त्रास सहन करावा लागत आहे.
नगरपरिषदेने सदर जागेवर दुसरे बॅरिकेट्स लावण्याची मागणी जोर धरून आहे. या आशयाचे निवेदन नगरपालिका प्रशासनाला देण्यात आले. शास्त्रीनगर भागामध्ये नेहमीच वर्दळ असते लहान मुले व आबाला वृद्ध या मार्गावरून नेहमी ये जात असतात अशात जड वाहने या मार्गावरून जात असल्याने रस्ते खराब होऊन या ठिकाणी मोठा अपघात होण्याची दाट शक्यता आहे. यापूर्वी या भागात बेरिकेट्स लावले होते मात्र काही जणांना ते अडचणीचे ठरत असल्याचे बोलले जात आहे. अशात काही महिन्यापूर्वी या बेरीकेट्सला अज्ञात वाहनाने ठोस दिल्यामुळे ते मोडकळीस आले त्यानंतर जड वाहने या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणावर जाऊ लागली आहेत. बॅरिकेट्सला ठोस मारून आपल्या फायद्यासाठी याच्या उपयोग तर करत नाही ना अशीही शंका या निमित्ताने चर्चेमध्ये आहे. दोन नंबरी याच्या फायदा घेत असल्याचे बोलले जात आहे.तरी नगरपालिका प्रशासनाने त्वरित यावर कारवाई करून बॅरिकेट्स लावावे अन्यथा स्थानिक नागरिकांकडून सनदशील मार्गांने आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. निवेदन देतेवेळी शास्त्रीनगर भागातील ज्येष्ठ नागरिक प्रकाश खैरनार,राजेंद्र कासार, दिनेश खैरनार, प्रशांत पाटील, मनोज बोरसे, मनोज भांडारकर,हेमंत शर्मा, गोपी सैन,भावेश पाटील आदी नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.