.अन्यथा शेतकऱ्यांकडून नवापूर विज वितरण कंपनीच्या कार्यालयावर मोर्चा व रास्ता रोको आंदोलन..
नवापूर तालुक्यातील वडकुट फिडर वरील शेतकऱ्यांनी आज शेती पंपचा विज पुरवठा कमी दाबाचा पुरवठा केला जातो त्यामुळे शेती पंप चालत नाही म्हणून नवापूर येथे विद्युत वितरण कंपनीचे अभियंता शेख,विनायक चव्हाण यांची भेट घेऊन चर्चा केली. व याबाबत तक्रार केली
विसरवाडी सब स्टेशन येथील वडकुट फिडरवर विज पुरवठा केला जातो.दर वर्षी या फिडरवरुन शेतकर्याना विजेचा प्रश्न भेडसावत असतो या वर्षी ही मागील महिन्यापासुन शेती पंपाचा विज पुरवठा कमी दाबाचा केला जात असल्यामुळे शेती पंप चालत नाही.त्यामुळे शेतक-यांचे पिक धोक्यात आले आहे.वडकुट फिडरवर करंजी बु, पाटीबेडकी,वडकुंट,कोलदा,बोरपाडा,कामोद,खोकसा,कोटखाम,कुंकरान इत्यादी गावे येतात .हा संपुर्ण परीसर मोठा असल्यामुळे विजेचा प्रश्न निर्माण होत असतो यासाठी पाटीबेडकी येथे ३३ के व्ही विज केंद्र मंजुर करण्यात आले आहे.पाटीबेडकी गांवकरीनी सब स्टेशनला जागा दिलेली आहे.शासनाचे सर्व नियमानुसार विद्युत वितरण कंपनीचा नावाने जागा दिलेली आहे पंरतु गावक-याचा काही प्रमाणात जागा देण्यास विरोध आहे.यामुळे सदर सब स्टेशन चे काम रखडले आहे. पर्यायी जागा जवळचा ठिकाणी उपलब्ध करुन देण्यासाठी शेतकरी प्रयत्नशील आहे.आता विद्युत वितरण कंपनीने दुसऱ्या जागाची पहाणी करुन त्याठिकाणी सब स्टेशनाचे काम सुरु करावे अशी मागणी शेतक-यांची आहे.वडकुट फिडरवर पुर्ण क्षमतेने विज पुरवठा करण्यात यावा व ३३ के व्ही विज केंद्राचे काम दुस-या जागेवर सुरु करण्याची मागणी शेतकरी वर्गाने केली आहे.अन्यथा नवापूर विज वितरण कंपनीच्या कार्यालयावर मोर्चा व रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल व होणा-या परीणामास सर्वस्वी विद्युत वितरण कंपनी व शासन जवाबदार राहील यांची नोंद घ्यावी यावेळी नंदुरबार जिल्हा आदिवासी कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा करंजी बु सरपंच आर सी गावीत,शेतकरी शिवाजी गावीत,रतीलाल गावीत,मान्याभाई गावीत,जया गावीत,किशन गावीत,योसेफ गावीत,कंत्तु गावीत,सत्तरसिंग गावीत,जयंत्या गावीत,वंत्या गावीत,मगन गावीत,छगन गावीत,सुनिल गावीत,वचु गावीत,दाज्या गावीत,इत्यादी शेतकरी विज कंपनी कार्यालयात उपस्थित होते.