नागरिक उड्डाण मंत्री श्री. किंजरापु राममोहन नायडू यांची भेट घेऊन नंदुरबार येथे नवीन विमानतळाच्या मागणीसंदर्भात निवेदन दिले. नंदुरबार हे महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि गुजरातच्या सीमेवर असलेले महत्त्वाचे ठिकाण असून, ‘आस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट’ म्हणून हवाई प्रवासाच्या सुविधा विकसित होण्यासाठी योग्य स्थान आहे.
विमानतळामुळे #नंदुरबार लोकसभा मतदारसंघाचा आर्थिक विकास वेगाने होईल, स्थानिक रोजगाराच्या संधी वाढतील आणि औद्योगिक वाढीस चालना मिळेल. मोठ्या कंपन्या व नवउद्योजक येथे येण्यास प्रोत्साहन मिळेल, तसेच आदिवासी तरुणांचे स्थलांतर रोखण्यासाठीही मदत होईल. या सर्व सकारात्मक गोष्टी त्यांना सांगितल्या असून येणाऱ्या काळात निश्चित हा प्रश्न मार्गी लागेल हा विश्वास आहे...