वयोवृद्ध व महिला बाल गोपाल यांच्या सानिध्यात 44 भाविकांनी माऊली टूर्स अँड ट्रॅव्हल्स यात्रा ग्रुप आणि महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ नवापूर आगार यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतीच अष्टविनायक यात्रा संपूर्ण झाली. या अष्टविनायक यात्रा दिनांक 27 जानेवारी रोजी सकाळी 4.00 वाजता नवापूर होऊन नंदुरबार मार्गे शिर्डी येथे साईबाबांचे दर्शन घेतले. लगेच ओझर च्या श्री विघ्नेश्र्वर या गणपती दर्शनासाठी रवाना होऊन ओझर या स्थानी मुक्काम करून पहाटे लगेच लेण्याद्री या उंच ठिकाणी वसलेल्या श्री गिरिजात्मक या गणरायाचे सर्व भाविकांनी दर्शन घेतले. लगेच महाड येथील श्री वरदविनायक या गणपती बाप्पांच्या दर्शनासाठी सर्व भाविक निघाले. सायंकाळी पाली येथील बल्लाळेश्वर या गणरायाचे दर्शन करून रांजणगाव या ठिकाणी मुक्कामासाठी गेलो. रात्री 7.00 वाजता प्रति शिर्डी ( शिरगाव) येथे पोहोचून सर्व भाविकांनी मुक्काम केला. आणि पहाटे 6.00 वाजता साई बाबा यांचे दर्शन करून पुढच्या थेऊर येथील श्री चिंतामणी बाप्पा यांचे दर्शन करून मोरेगावच्या श्री मयुरेश्वर या गणरायांचे सर्व भाविकांनी दर्शन घेतले. यानंतर सिद्धटेक चा श्री सिद्धिविनायक गणरायाचे दर्शन आणि मुक्कामाला रांजणगावचा श्री महागणपतीचे दर्शन करून रांजणगाव येथे सर्व भाविकांनी. मुक्काम केला. अशाप्रकारे अष्टविनायक दर्शन यात्रेचा समारोप दुसऱ्या दिवशी म्हणजे दिनांक 30 रोजी पहाटे लवकर निघून श्री क्षेत्र शनिशिंगणापूर दर्शन घेऊन श्री दत्त मंदिर देवगड येथे दर्शन घेऊन दुपारचे भोजन केले. या दोन स्पॉटचे दर्शन करून घृष्णेश्वर मंदिरात वेरूळ येथे धावते दर्शन करून गाडी चाळीसगाव मार्गे धुळे जाऊन काही प्रवासी धुळे ला उतरले,तर काही साक्री उतरले.त्यानंतर नंदुरबार मार्गे नवापूर कडे परतीच्या प्रवास सुरू झाला.रात्री 2.00 वाजता उशिरापर्यंत गाडी नवापूर डेपो मध्ये पोहोचली. संपूर्ण प्रवास आनंददायी वातावरणात संपन्न झाला.
या उपक्रमासाठी उस्फुर्त प्रतिसाद हा नवापूर आगाराचे बस डेपो मॅनेजर विजय पाटील, स्थानक प्रमुख जगताप साहेब, नियंत्रक संदीप ब्राम्हणे, रमिजराजा काझी, चालक संभाजी कोळी, सुनील चव्हाण यांनी दिला. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पुष्पा वाघ, राजश्री बोरसे, किरण बोरसे, मनीषा लिंगायत, निर्मला जाधव, लक्ष्मीबाई राठोड, कमळजाबाई पाटील, रेखा भोये, पांडुरंग शिंपी, मुरलीधर देसाई, सविता सोनार, चंद्रकला चौधरी, दिलबरसिंग पाडवी, सुरेंद्र चौरे, भटु भोये,आरती राठोड यांनी प्रयत्न केले, सुनंदाबाई ठाकूर, अलका गायकवाड यांनी प्रयत्न केले.