दी नवापूर एज्युकेशन सोसायटी द्वारा संचालित श्रीमती एस एम चोखावाला लिटल एंजल्स अकॅडमी नवापूर येथे दिनांक 19 फेब्रुवारी 2025 रोजी अखंड हिंदुस्तानाचे आराध्य दैवत श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती जय भवानी जय शिवाजीच्या मोठ्या गर्जनेसह उत्साहात साजरी करण्यात आलीं.
कार्यक्रमाप्रसंगी शाळेचे सर्व शिक्षक गण व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या उत्साहाने उपस्थित होते. शाळेचे तंत्र सहाय्यक राहुल अहिरे सरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास फुलहार अर्पण करून पूजन केले तसेच इतर शिक्षक वर्गाने देखील पुष्प अर्पण करून पूजन केले. महेंद्र अहिरे सरांनी कार्यक्रमाची प्रस्तावना करीत जय भवानी जय शिवाजी अशी गर्जना करीत महाराजांना वंदन केले व महाराजांच्या कार्याची महती उपस्थितांना करून दिली.