नवापूर येथील श्री शिवाजी हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी डॉक्टर पराग सोनवणे यांची मुंबई येथील टाटा मेमोरियल हॉस्पिटल ला एमडी अॅनेस्थेसियासाठी निवड करण्यात आली आहे. आपले मोठे बंधू डॉक्टर कुणाल सोनवणे यांच्या पावलावर पाऊल ठेवून डॉ.पराग यांनी यश संपादन करून वैद्यकीय क्षेत्रात गगन भरारी घेतली आहे. तर डॉक्टर कुणाल यांनी मागच्या महिन्यातच रेडिओलॉजिस्ट मध्ये एमडी ही पदवी संपादन केली आहे. डॉक्टर कुणाल हा सध्या नंदुरबार जिल्हा शासकीय हॉस्पिटल येथे कार्यरत आहेत. डॉक्टर कुणाल व डॉक्टर पराग हे नवापूर येथील श्री शिवाजी हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालयाचे उपमुख्याध्यापक ए. एन सोनवणे व वनिता विद्यालयाच्या ज्येष्ठ शिक्षक सुनिता सोनवणे यांचे चिरंजीव आहेत. डॉक्टर पराग यास नॅशनल मेडिकल इन ट्रान्स मध्ये 800 पैकी 600 मार्क होते.एमडी अॅनेस्थेसिया त शस्त्रक्रिया प्रक्रियेची कार्यक्षमता आणि सुरक्षितता वाढते. एमडी अॅनेस्थेसियासाठी प्रवेश मिळण्यासाठी राष्ट्रीय स्तरावरील NEET PG परीक्षा द्यावी लागते. ही परीक्षा राष्ट्रीय शिक्षण मंडळ (एनबीई) आयोजित करते. डॉक्टर पराग व डॉक्टर कुणाल यांच्या या यशाबद्दल श्री शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालया तर्फे त्यांचे अभिनंदन करण्यात आले. डॉक्टर, समाज बांधव,नातेवाईक, मित्रपरिवार, शिक्षक यांनी अभिनंदन केले आहे