दहावीसाठी ५० ते १२ वी साठी २८ केंद्र राहणार आहेतनंदुरबार जिल्ह्यात यावर्षी कॉफी मुक्त होणार असून जिल्हा प्रशासन सतर्क मोडवर आला आहे.
नंदुरबार शहरात आणि जिल्ह्यात होणाऱ्या दहावी बारावीच्या परीक्षांवर ड्रोन आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्याची कडक नजर राहणार आहे. नंदुरबार जिल्हा कॉफी मुक्त करण्याच्या जिल्हा प्रशासनाचे मानस असून त्यामुळे परीक्षेच्या वेळेस कुठलाही अनुचित प्रकार घडूनही यासाठी जिल्हा प्रशासन सतर्क झाले असून परीक्षेच्या काळात ड्रोन कॅमेऱ्याने लक्ष ठेवलं जाणार आहे त्यामुळे कॉफी मुक्त परीक्षा घेतली जाणार आहे त्यासोबतच जिल्हा पोलीस दल देखील सतर्क झाला असून परीक्षेच्या काळात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला जाणार आहे. नंदुरबार जिल्ह्यात दहावीसाठी ५० ते १२ वी साठी २८ केंद्र राहणार आहेत.या सर्व केंद्रांवर ड्रोन कॅमेरा सीसीटीव्ही आणि पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणावर राहणार आहे.दहावी व बारावी परीक्षेच्या संवेदनशील केंद्रावर चित्रीकरण केले
जाईल. प्रत्येक ब्लॉकवर सीसीटीव्ही कॅमेरे आवश्यक आहेत. नसल्यास मोबाइलद्वारे चित्रीकरण केले गेले पाहिजे. कॉपीमुक्त परीक्षा झाली पाहिजे
अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी दक्षता समितीच्या बैठकीत बोलताना दिल्या.
@विविध पथके राहतील कार्यान्वित....
भरारी पथकात जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, प्राचार्य जिल्हा शिक्षण व
प्रशिक्षण संस्था, शिक्षणाधिकारी आणि महिला अधिकारी यांचे पथक नियुक्त करावे.मुला-मुलींचे स्वच्छता गृह वेगळे असावे. झेरॉक्स सेंटर बंद ठेवावे. १०० मीटरच्या आत पालकांना येण्यास बंदी करावी. अशा सूचना नियुक्त पोलिस कर्मचारी यांना देण्यात
याव्यात.परीक्षा केंद्रावर एक पोलिस अधिकारी, आवश्यकते नुसार पोलिस कर्मचारी व होमगार्ड यांची नियुक्ती करण्यात यावी. अशाही देण्यात आल्या आहेत. यंदा काही विद्यार्थ्यांच्या मनात कभी खुशी कभी गम दिसून येत आहे