२०२५ चा प्रयागराज कुंभमेळा हा एक हिंदू उत्सव आहे, जो एकाच ठिकाणी जगभरातील मानवजातीला एकत्र आणण्याचा उत्सव आहे. २०१९ मध्ये प्रयागराज येथे झालेल्या अर्धकुंभमेळ्यात जगभरातून १५० दशलक्ष पर्यटक आले होते. ही संख्या १०० देशांच्या एकत्रित लोकसंख्येपेक्षा जास्त आहे. खरं तर युनेस्कोने त्याला अमूर्त सांस्कृतिक वारसा म्हणून सूचीबद्ध केले आहे. महाकुंभमेळा म्हणून ओळखला जाणारा आगामी कुंभमेळा २०२५ मध्ये प्रयागराज (अलाहाबाद) येथे सुरू आहे. या तिसऱ्या स्नाना साठी गुजरात महाराष्ट्र सीमेवर असलेल्या नवापूर येथील युवक प्रयागराज जाण्यासाठी रवाना झाले. बाबा अमरनाथ ग्रुप तर्फे नवापूर शहरात विविध धार्मिक कार्यक्रम करत असतात. धार्मिक कार्यात ते नेहमी अग्रेसर असतात. शहरात कोणताही उत्सव व कार्यक्रम असो त्यात बाबा अमरनाथ ग्रुप हा कार्य तत्पर दिसून येतो. आता हा ग्रुप युवकांना घेऊन प्रयागराज साठी नवापूर शहरातील श्री शिवाजी रोड येथुन निघाला आहे. श्री शिवाजी रोड परिसरातील रहिवासी व युवक राञी ११ वाजता प्रयागराज महाकुंभ मेळाव्याला निघाले यात १५ भाविकांच्या समावेश आहे. श्री शिवाजी रोड येथुन भाविकांना घेऊन जाणाऱ्या लक्झरी वाहणाचे विधिवत पुजन अजय पद्माकर गावीत यांनी करून शुभारंभ केला व सर्व भाविकांना यात्रेसाठी शुभेच्छा दिल्या. नवापूरकरांच्या निरोप घेत भाविक प्रयागराज महाकुंभ मेळाव्यात रवाना झाले. यात भाविक पंकज हिंगु,हरीष हिंगु,भिकु मावची सह १५ भक्त नवापूर शहरातुन जय जयकार रवाना झाले. यासाठी उपस्थितांनी शुभेच्छा दिल्या