सामजिक कार्यकर्ते कृष्णा निकम हे उप वनसंरक्षक अधिकारी प्रादेशिक नंदूरबार यांच्या कार्यालया समोर उपोषणास बसले आहेत. नंदुरबार रो ह यो वन क्षेत्रपाल हे जाणून बुजून भष्टाचार लपविण्यासाठी माहिती देण्यास तयार नाही तसेच नंदुरबार रो हा यो वन विभागाच्या कार्यालयातुन बोगस बिले तयार केलेल्या रेकॉर्ड गायब करण्यात आले आहे तरी रेकॉर्ड गायब करणाऱ्या वन अधिकाऱ्यांन वरीत कायदेशीर गुन्हा दाखल करावा नंदुरबार रो हा यो वन क्षेत्रपाल यांच्या कडे माहितीचा अधिकार कायदा 2005 अंतर्गत भांगडा सोनपाड नर्सरी व ईतर कामाची माहिती मागितली होती परंतु वन क्षेत्रपाल यांनी जाणून बुजून हेतुपुरस्सकर माहिती देण्यास टाळाटाळ केली म्हणून सहाय्यक वनसंरक्षक अधिकारी प्रादेशिक व वन्य जीव यांच्या कडे प्रथम अपील दाखल केली असता प्रथम अपीलाय अधिकारी यांनी अर्जदार यांना विना मुल्य माहिती उपलब्ध करून देण्यात यावी असे आदेश दिले होते तरी वन क्षेत्रपाल यांनी वरिष्ठ अधिकाऱ्याचे आदेशाला न जुमानता माहिती अधिकार कायद्याला केराची टोपली दाखवली तसेच नंदुरबार रो हा यो मध्ये भांगडा सोनपाड नियत क्षेत्रात अतिक्रमण काढण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे परंतु वन अधिकाऱ्यांनी बोगस बिले तयार करून भष्टाचार केला आहे व ते बोगस बिलाचे रेकॉर्ड गायब करण्यात आले आहे म्हणून ती माहिती देण्यास वन क्षेत्रपाल तयार नाहीत. असे निवेदनात म्हटले आहे तरी या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते कृष्णा निकम यांनी वेळोवेळी उप वनसंरक्षक अधिकारी प्रादेशिक नंदुरबार यांना लेखी व तोंडी कळविले आहे परंतु उप वनसंरक्षक अधिकारी प्रादेशिक नंदुरबार हे ह्या दोषी वन अधिकाऱ्यांना पाठिशी घालीत आहे म्हणून मी एक दिवसीय लक्षणीय उपोषणाला बसलो आहे तरी मला संपूर्ण माहिती न मिळाल्यास मी पुढिल कायदेशीर पाऊल उचलणार आहे असे त्यांनी सांगितले