शब्दांमध्ये ताकद असते, आणि ही ताकद आता एका आदिवासी तरुणाच्या लेखणीतून विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात स्थान मिळवत आहे!
नंदुरबार जिल्ह्यातील संतोष पावरा या तरुण कवीच्या कवितेने महाराष्ट्र विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात स्थान मिळवले आहे. त्यांच्या ‘ढोल’ या कवितासंग्रहातील कवितेचा समावेश विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात करण्यात आला आहे. हा केवळ साहित्यिक गौरव नाही, तर एका सामान्य कुटुंबातून आलेल्या तरुणाने आपल्या प्रतिभेच्या जोरावर घेतलेली मोठी झेप आहे.
संतोष पावरा यांनी आपल्या कवितेतून आदिवासी जीवन, वास्तव, संस्कृती आणि संघर्षाला वाचा फोडली आहे. त्यांच्या कवितेतून “कुपोषण” यांसारख्या गंभीर सामाजिक विषयांवर प्रकाश टाकण्यात आला आहे. त्यांच्या या प्रवासात मेहनत, जिद्द आणि संघर्षाचा सुंदर संगम पाहायला मिळतो.ही केवळ संतोष पावरा यांच्यासाठीच नाही, तर संपूर्ण आदिवासी साहित्य जगतासोबतच जिल्हावासीयांसाठी अभिमानास्पद बाब आहे! त्यांच्या यशाने अनेक नवोदित साहित्यिकांना प्रेरणा मिळेल. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर, संतोष पावरा यांच्या कवितेचा विद्यापीठ अभ्यासक्रमात समावेश होणे ही विशेष गौरवाची बाब आहे. मराठी साहित्याच्या श्रीमंतीत भर घालणाऱ्या या प्रवासासाठी त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा!
📚 साहित्याच्या माध्यमातून समाजपरिवर्तन घडवणाऱ्या संतोष पावरा यांचे अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा!