नवापूर- हेल्प इंडिया फाउंडेशनचे अध्यक्ष प्रदिप नगराळे यांचे वाढदिवसाच्या निमित्ताने रक्तदान शिबीर आयोजित करण्याचे नियोजन त्यांचा सुविद्य पत्नी तथा नवापूर उपजिल्हा रुग्णालय येथील वैद्यकीय अधिकारी डॉ हर्षदा बिसवास नगराळे यांच्या संकल्पनेतून साकार करण्यात आले.रक्तदान शिबीर भारतरत्न महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा प्रांगणात आयोजित करण्यात आले.सर्व प्रथम महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला प्रमुख अतिथी तथा वैद्यकीय अधिकारी डॉक्टर कीर्तीलता वसावे यांनी पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले.प्रसंगी प्रदिप नगराळे यांनी बौद्धवासी आई तक्षशिला देविदास नगराळे तसेच बौद्धवासी वडील देविदास हेमाजी नगराळे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आशिर्वाद घेत रक्तदान शिबिराच्या शुभारंभ करण्यात आला.रक्त संक्रमण परीषद महाराष्ट्र राज्य यांच्या अखत्यारीत उपजिल्हा रुग्णालय नवापूर,जिल्हा रूग्णालय नंदुरबार,शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांच्या टीमने रक्तसंकलन करण्याचे कार्य केले.हेल्प इंडिया फाउंडेशनने आयोजित रक्तदान शिबीरात मोठ्या प्रमाणात दात्यांनी रक्तदान करून आपले कर्तव्य पार पाडले.राजकीय, सामाजिक, वैद्यकीय,शैक्षणिक,वैचारिक,कामगार, आदि क्षेत्रातील नागरीकांनी मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबीराचा लाभ घेत स्वताहून रक्तदान केले.रक्तदान कार्य महान, तुमचे रक्तदान वाचवेल इतरांचे प्राण असे हेल्प इंडिया फाउंडेशनचा फलकावर सूचक विधान देण्यात आले होते. हेल्प इंडिया फाउंडेशनचे अध्यक्ष प्रदिप नगराळे म्हणाले की,रक्ताची गरज आणीबाणीचा वेळी लक्षात येते शासकीय रुग्णालयात सिझर ऑपरेशन, जिल्ह्यात सिकलसेल अनिमिया आजार,अपघात प्रसंगी रक्ताची गरज पाहता रक्तदान शिबिरांची नितांत आवश्यकता असते त्यातुन रक्तदानाचे महत्त्व कळते.तसेच रक्तदान शिबीरात मित्र परिवाराचा सिंहाचा वाटा असुन त्यांचा प्रयत्नाने हा कार्यक्रम पार पडला असे म्हणत कार्यकर्त्यांचे आभार मानले. रक्तदान शिबीरात नवापूर उपजिल्हा रुग्णालयाचे स्टाफ डॉ. सुनिल गावीत,डॉ कांचन वसावे,डॉ प्रिती गावीत,यांची कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती. रक्तदान शिबीराचा संपूर्ण कार्यक्रम नवापूर उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला आहे. रक्तदान शिबीरात डॉ.अजित विश्वास,मनोहर नगराळे, सेवानिवृत्त तहसिलदार गुलाबसिंग वळवी, एस आर पहुरकर ,प्रा. सुरवाडे,महेंद्र नगराळे, छोटु आहिरे,सेवानिवृत्त नायब तहसिलदार मिलिंद निकम,डॉ प्रमोद कटारिया,राजु गावीत,दशरथ नगराळे, कान्हा आतारकर आदी उपस्थित होते.मान्यवरांच्या हस्ते रक्तदान केलेल्या रक्तदात्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी भावेश पवार,मूसा अमीर काकर,विजय वळवी,राहुल इसन नगराळे,अर्जुन सावरे,हेमंत नगराळे,रविंद्र गवळे,मार्सेल नगराळे, समीर मोहिते,गौरव नगराळे,मितेश सुर्यवंशी,विनोद पाटील,मानव गावीत,अमर गावीत,शरिफ पठाण,अनिल मोरे,विपूल पवार, रोहन पवार, सागर सोलंकी,रवि गावीत,यश नगराळे, राकेश दूबला,रोशन पाटील, विक्की कोळी, मोसिन शेख, वसिम शेख,रिजवान शेख,अदनान शेख,वसिम खाटिक,विक्रमसिंह राजपूत,अमित पटेल आदिंनी परिश्रम घेतले.