शहादा येथील चावरा इंग्लिश मीडियम स्कूलच्या रौप्य महोत्सवानिमित्त. चावरा पब्लिक स्कूलमध्ये उच्च सायन्स एक्सपो आविष्काराचे व चावरा इंग्लिश मीडियम स्कूल charity and fun fair day कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .या कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. योगेश कुमार साळवे यांनी केले त्यावेळी फादर एलेक्स सहिमान, फादर टेनी (चावरा इंग्लिश मीडियम स्कूल मुख्याध्यापक), फादर जॉय (चावरा संस्थाचे संचालक)फादर सीजीन (चावरा इंग्लिश मीडियम स्कूल शहादा मुख्याध्यापक), फादर विजो जॉर्ज (चावरा पब्लिक स्कूल शहादा मुख्याध्यापक) हे उपस्थित होते. सर्वप्रथम ऐतिहासिक टप्पा ,मध्ययुगीन टप्पा व आधुनिक टप्पा पासून सुरुवात करण्यात आली.त्यानंतर विद्यार्थ्यांनी आपापले स्वतः बनवलेले प्रोजेक्ट.वर्गानुसार मेगा प्रोजेक्ट. सर्व विषयाचे प्रदर्शन आणि तारांगण या सर्व प्रदर्शनांचा समावेश होता. चावरा इंग्लिश मीडियम स्कूलच्या रौप्य महोत्सव निमित्त जमा झालेल्या फंड मधून जो निधी आला त्यामधून ज्या .खेडेगावांमध्ये पाणी पुरवठा कमी प्रमाणात आहे. तेथे बोअरवेल, हात पंप बसवून देणार आहे यावेळी योगेश साळवे सरांनी सर्वांना मार्गदर्शन केले व प्रोत्साहन केले प्रदर्शनाबद्दल कौतुक केले. हे प्रदर्शन मुख्याध्यापकांच्या व शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडले......