शबरी माता शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नवापूर जिल्हा नंदुरबार येथे वीर सावरकर पुण्यतिथी निमित्त 100 दिवसीय कार्यक्रम आराखड्यानुसार राष्ट्रीय सेवा योजना एन एस एस अंतर्गत नेत्र तपासणी शिबिर तसेच मरणोत्तर नेत्रदान करण्यासाठी स्वेच्छेने अर्ज भरणे हा कार्यक्रम संपन्न झाला. याप्रसंगी संस्थेचे प्राचार्य गटनिर्देशक श्री बैरागी सर शिल्प निदेशक श्री गिरासे सर जिल्हा उपजिल्हा रुग्णालय नवापूर चे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अनिल गावित उपस्थित होते. नेत्रचिकित्सा अधिकारी सुषमा शेलार यांनी नेत्र तपासणी करून नेत्रदानची माहिती व नेत्रदाना चे महत्व सांगून जनजागृती केली .तसेच मरणोत्तर नेत्रदान करण्यासाठी इच्छुक लोकांनी फॉर्म भरून दिलेत.नेत्रदान एक दिव्यदान असून ते एक मोठें महान कार्य आहे.नेत्रदान म्हणजे काय?डोळ्याची रचना कशी प्रकारे असते ? नेत्रदानाचे महत्व ? नेत्रदान कसे करायचे ? हे सगळे मुद्दे व्हिडिओ द्वारे नेत्र चिकित्सा अधिकारी सुषमा शेलार यांनी सविस्तर समजावून सांगितले ,तसेच इच्छुक लोकं म्हणजेच ४५ जणांनी नेत्रदानाचे फॉर्म भरून ही दिलेत ..
शबरी माता शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नवापूर येथे वीर सावरकर पुण्यतिथी निमित्त राष्ट्रीय सेवा योजना एन एस एस अंतर्गत नेत्र तपासणी शिबिर
February 25, 2025
0