नवापूर येथील गोपालराव पवार सर, हे कायमच सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, कामात सक्रिय असल्याने व विविध प्रकारे कायदेशीर मार्गदर्शक करून लोकांना मदत केली आहे. यांचे हे कार्य पाहून नवापूर तालुका विधी सेवा प्राधिकरण समितीचा अध्यक्ष मार्फत गोपाल पवार सरांची नवापूर कोर्टात विधी सेवा क्लिनिक मधील अनुक्रमाक पाच वर पीएलवी म्हणून यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गोपाळराव पवार सरांची पीएलवी नियुक्तीझाल्यामुळे नवापूर परिसरातील मित्र परिवार व व्यापारी यांनी माहिन कॉप्युटर क्लासेस येथे कृषी उत्पन्न बाजार समिती व्यापारी गाळे असोसिएशन तर्फे सत्कार करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. नंदुरबार जिल्हा विधी सेवा क्लिनिक मध्ये पॅनल वकील व पी एलवी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्राधिकरण समितीवर विधीज्ञ व विधी स्वयंसेवक यांची नियुक्ती दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर नवापूर येथे विधि सेवा क्लिनिक येथे करण्यात आली आहे. यात पीएलव्ही म्हणून सानाबानो इसा खान पठाण, संजय पोपटराव सोनवणे, राहुल दिलीप वसावे, संतोष दत्तू वसावे, गोपाळराव निंबाजी पवार यांची तर पॅनल विधीज्ञ म्हणून पी. जे गावित, आर एम वळवी, पी ए वसावे, आर बी कुलकर्णी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तालुका विधी सेवा प्राधिकरण समिती नवापूर अध्यक्ष ए.के बनकर यांनी नियुक्ती केली आहे. गोपाळराव पवार यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांच्या कृषी उत्पन्न बाजार समिती व्यापारी गाळे असोसिएशन तर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी माहीन कॉलेज ऑफ कॉम्प्युटर एज्युकेशन नवापूर संस्थापक सैफुल्ला खान,ज्ञानेश्वर पुराणिक,हेमंत पाटील, सचिन कोतकर, अक्षित अग्रवाल, दर्शन पाटील, दर्शन ढोले,गिरिष सोनवणे आदी उपस्थित होते.