राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर अपघात क्षेत्र बनले.. अपघात सत्र होताना महामार्ग विभागा च्या काना डोळा
धुळे सुरत राष्ट्रीय महामार्ग वरील महामार्गाचे काम केव्हा पूर्ण होणार येथे अपघातांना रोज खुल्ले निमंत्रण मिळत आहे धुळे सुरत महामार्गावरील बर्डीपाडा येथील नवीन टोल तयार होत असलेल्या ठिकाणी कोणतेही सूचना फलक किंवा बॅरिकेटिंग स्टिकर लावण्यात आलेले नाही अशातच पुन्हा अपघात घडला रात्री चार वाजेच्या सुमारास सुरत होऊन मालेगाव कडे प्लास्टिक घेऊन जाणारा माल ट्रोक क्रमांक एम एच 41 ए यु 8060 यावरील चालकाला महामार्गावरील रस्त्याचा अंदाज न आल्याने डिव्हायडर ला आढळून माल ट्रोक महामार्गावर पलटी झाल्याची घटना घडली आहे या अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नाही तर वाहन चालक किरकोळ जखमी झाला असून मालट्रक चे पूर्णतः पुढचे टायर निखळून पडले आहेत या अपघातात माल ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे. धुळे सुरत महामार्गावरील बर्डीपाडा येथील टोल नाक्यावर अपूर्ण कामामुळे अपघातांना खुले निमंत्रण मिळत आहे. या ठिकाणी सूचना फलक लावण्यात यावे अशी मागणी जोर धरू लागली आहे. महामार्गावर दररोज होत असले तरी कोणती ठोस उपाययोजना दिसून येत नाही. धुळे सुरत महामार्गावरील अपघातांना आळा केव्हा बसणार हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. परंतु ठेकेदार व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी मात्र गाढ झोपेत दिसुन येत आहे अशी प्रतिक्रिया वाहनधारकांनी व्यक्त केली.