श्री शिव आणि श्री पार्वतीच्याविवाह सोहळा जल्लोषात व फटाक्यांच्या आतिशबाजी साजरा...
महाशिवरात्री हा एक हिंदू सण आहे, जो दरवर्षी फेब्रुवारी ते मार्च दरम्यान श्री शिवांच्या सन्मानार्थ साजरा केला जातो. हिंदू दिन दर्शिकेनुसार हा सण फाल्गुन महिन्याच्या पूर्वार्धाच्या चौदाव्या दिवशी साजरा केला जातो. हा सण श्री शिव आणि श्री पार्वतीच्या लग्नाचे स्मरण करतो, आणि या प्रसंगी शिव त्याचे दैवी तांडव नृत्य करतात.ध्यानस्थ बसलेल्या शिवाची मूर्ती हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण आहे, जो जीवनात आणि जगामध्ये "अंधार आणि अज्ञानावर मात करण्याचे" स्मरण आहे. या दिवशी श्री शिवाचे स्मरण करतात आणि प्रार्थना, उपवास, नैतिकता आणि सद्गुणांचे मनन करून साजरा केला जातो. या अनुषंगाने नवापूर शहरात महाशिवरात्री मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.श्री नागेश्वर महादेव मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते पहाटे सकाळी पाच वाजेला महा अभिषेक तसेच सत्यनारायण पूजन ध्वजारोहण महाआरती व दुपारी मध्यान आरती त्याचप्रमाणे सायंकाळी ठीक पाच वाजता श्री महादेव पार्वती माता झाकी बनवून संपूर्ण नवापूर नगरीत काढण्यात आली होती
त्याचप्रमाणे मिरवणूक पूर्ण झाल्यानंतर विवाह सोहळा अति जल्लोषात व फटाक्यांची आतिशबाजी करत पार पाडण्यात आला तदनंतर ठीक साडेसात वाजता महाआरती करण्यात आली श्री नागेश्वर महादेव यांना अत्यंत सुंदर असा शृंगार करण्यात आला होता त्यानंतर साबुदाण्याची खिचडी चे प्रसाद वाटप व रात्री भजन संध्या आणि ठीक बारा वाजून पाच मिनिटांनी महाआरती करण्यात आली या संपूर्ण कार्यक्रमासाठी मंदिर समितीचे हिमांशू पाटील ,हरीश पाटील ,अमोल पाटील, कृष्णा रेड्डी ,संजय चौधरी ,राहुल पाटील,विनीत पाटील ,संजय पाटील ,गोविंद पाटील,जयेश पाटील,कुमारी पिऊ राणा ,पूजा लाड,मिनल पाटील,जोशना पाटील,वाघ ताई सौ सोनार ताई व इतर सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले. या स्तुत्य कार्यक्रमाचे नवापूर करांनी कौतुक व अभिनंदन केले आहे