शाळेच्या आठवणीने विद्यार्थी व शिक्षक झाले भावुक -शिक्षकांनी विद्यार्थ्यांना म्हटले बेस्ट ऑफ लक.. तर विद्यार्थी म्हणाले कभी अलविदा ना कहना...
छडी वाजे छमछम,विद्या येई घमघम’, असा शाळेचा प्रवास कधी संपतो हे ध्यानातच येत नाही. शाळा संपून आता कॉलेजमधील शिक्षण सुरू होणार याची चाहूल लागते ती शाळेतल्या या निरोप समारंभात. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या आठवणींना जसा उजाळा मिळतो, तसे पुढील करिअरसाठी ‘बेस्ट लक’ हे शब्द पाठबळ देऊन जातात. त्या अनुषंगाने नवापूर येथील श्री शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभ उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपमुख्याध्यापक ए एन सोनवणे सर उपस्थित होते तर यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्या कमल कोकणी मॅडम,ज्येष्ठ शिक्षक आर के पाटील सर उपस्थित होते. यावेळी अर्चना बिरारी मॅडम प्रशांत पाटील सर, शोभा गिरासे मॅडम यांनी मनोगत व्यक्त केले.
त्यांनी यश आणि अपयश या एकाच नाण्याच्या दोन बाजू असून अपयश आलं तर खचू नका, कोलमडू नका, पुन्हा प्रयत्न करा,यश नक्कीच तुमच्या पायाशी लोळण घेत येईल असे सांगितले.मित्तल बिराडे, पुष्कर कोळी, यांनी मनोगत व्यक्त करतांना सांगितले की.शिक्षकांनी खूप मेहनत घेऊन आम्हाला शिकवले. त्यांची मेहनत आम्ही वाया जाऊ देणार नाही. अशी ग्वाही यावेळी त्यांनी दिली. प्राचार्या कमल कोकणी मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की सर्वानी अभ्यासाचे व्यवस्थित नियोजन करा, न घाबरता पेपर लिहा, आत्मविश्वास ठेवा, आपणास निश्चित यश मिळेल अशा शुभेच्छा यावेळी देण्यात आल्या. दहावीच्या विद्यार्थ्यांकडून शाळेला व शिक्षकांना भेटवस्तू देऊन त्यांचे आशीर्वाद घेतले.उपमुख्याध्यापक ए एन सोनवणे सर म्हणाले की विद्यार्थ्यांनी चांगला निकाल लावून शाळेचे नाव उज्वल करा,परीक्षेला वेळेत जा,उत्कृष्ठ पेपर लिहून चांगले गुण मिळवा,जिथे जाल तिथे कष्ट करा आपले व आपल्या आई-वडिलांचे तसेच शाळेचे नाव उज्ज्वल करा असे प्रतिपादन केले. शिक्षक व शाळेला निरोप देताना विद्यार्थी व विद्यार्थिनी भावुक झाले होते.सुत्रसंचालन उन्नत्ती पाटील या विद्यार्थिनीने केले तर अध्यक्ष निवड दिव्यता ठाकरे अनुमोदन भाग्यश्री मंगले यांनी केले. प्रास्तविक नियती बंजारा,स्वागत तेजस्विनी पवार ,कृपा पाटील या विद्यार्थिनींनी केले आभार दिव्या गावितने मानले