रेल्वे प्रवाशांवर झालेल्या हल्ल्यात जखमी असलेले युवकाचा मृत्यू, नातेवाईकांच्या आक्रोश
February 03, 2025
0
नंदुरबार रेल्वे स्टेशन येथे जोधपुर चेन्नई रेल्वेत प्रवाशांच्या भांडणीतून नंदुरबार रेल्वे स्थानकावर दोन राजस्थानी प्रवाशांवर स्थानिक आठ ते दहा इसमांनी जीव घेणा हल्ला केला होता याच्यात चाकूने वार देखील करण्यात आले होते त्यात दोन इसम गंभीर जखमी झाले होते. जखमी इसमांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होता मात्र उपचारा दरम्यान एका प्रवाश्याचा दुर्दैवी अंत झालाय. सुमेर सिंग 26 वर्ष असे मृत्यू झालेला युवकाचे नाव आहे. मृत्यू झाल्यानंतर नंदुरबार जिल्हा रुग्णालयात नातेवाईकांनी गर्दी केली आहे. दरम्यान या घटनेमध्ये आठ ते दहा आरोपी असून या आरोपीं वर 302 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे .सदर घटना ही बसण्याच्या वादातून घडली असल्याचे निदर्शनास आले आहे त्यातील एका युवकाचा मृत्यू झाला आहे. आरोपीं निष्पन्न झाले असून त्यांना लवकर अटक करण्यात येईल असे लोहमार्ग पोलीस विभागाचे उपविभागीय अधिकारी सूर्यकांत बांगर यांनी सांगितले .दरम्यान आरोपीनी जो पर्यंत अटक करत नाही तो पर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असे मृत युवकांच्या परिवारातील लोकांनी सांगितले...