वनविभागीय अधिकारी धनंजय पवार यांच्या पथकाची कारवाई..!!
दोन लाखांचा सागवानी अवैध लाकूड साठा जप्त केला..!
बारी गावात दोन घरात वन विभागाचा छापा..!
मिळालेल्या गुप्त बातमीवरून सहाय्यक वनसंरक्षक प्रा.व वन्यजीव नंदुरबार म.वनक्षेत्रपाल नवापूर (प्रा.) व रेंज स्टाफ नवापूर प्रा.व चिंचपाडा प्रा . स्टाफसह शासकीय वाहनाने मौजे बारी येथे जाऊन व कमलेश बुधा कोकणी यांचे राहत्या घराची सर्च वॉरंट ने झडती घेतली असता त्यांचे घरात दिवाण फालके नग 8 व साग फळ्या नग चार दिसले तरी सदर माल जप्त करून मोजमाप घेऊन शासकीय वाहनात भरला नंतर अनिल तुकाराम कोकणी यांच्या राहत्या घराची सर्च वॉरंट ने झडती घेतली असता त्यांचे घरात तयार साग चौकट फेम नग 6 अवैधरित्या तयार करून ठेवलेले दिसले व अवैध वृक्षतोड करून कुऱ्हाडीने घडताळ केलेले साग चौरस व गोल नग.66 मिळून आले. तरी आरोपीचा आजूबाजूस शोध घेतला असता आरोपी मिळून आला नाही. सदर मुद्देमाल वनकर्मचारी यांनी जागेवरच मोजमाप घेऊन शासकीय वाहनात भरून शासकीय वाहनाने शासकीय विक्री आगार नवापूर येथे आणून पावतीने जमा केला. सदर मालाचे मोजमाप केले असता साग चौरस व गोल नग -66 घ.मी.0.750 साग दिवाण फालके नग 08 साग चोकट फेम नग 06 सदर मालाची बाजार भावानुसार अंदाजीत किंमत 1.5 ते 2 लाख आहे.
सदर कारवाई मा.श्रीमती निनू सोमराज मॅडम, वनसंरक्षक धुळे( प्रा.)मा.श्री.संतोष सस्ते साहेब उपवनसंरक्षक नंदुरबार वनविभाग नंदुरबार ,मा. राजेंद्र सदगीर साहेब विभागीय वनाधिकारी दक्षता पथक धुळे मा. धनंजय ग.पवार साहेब सहाय्यक वनसंरक्षक प्रादेशिक व वन्यजीव नंदुरबार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.सदर कार्यवाहीत मा.धनंजय ग.पवार साहेब सहाय्यक वनसंरक्षक प्रादेशिक व वन्यजीव नंदुरबार , मा.स्नेहल चं.अवसरमल मॅडम वनपरिक्षेत्र अधिकारी नवापूर प्रादेशिक ,वनपरिक्षेत्र स्टाफ नवापूर प्रादेशिक व वनक्षेत्र स्टाफ चिंचपाडा प्रादेशिक मधील वनपाल व वनरक्षक वाहन चालक तसेच संरक्षण मजूर यांनी सहभाग घेतला.वनपरिक्षेत्राधिकारी नवापूर प्रादेशिक यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास वनपाल वडकळंबी करीत आहेत .