@गजानन महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त जाहीर भंडाऱ्याच्या असंख्य भाविकांनी घेतला लाभ.. दर्शनासाठी मोठी गर्दी..!!
नवापूर--
गजानन महाराज यांचा प्रकट दिन माघ वद्य सप्तमी या तिथीला असतो. याच दिवशी, गजानन महाराज लोकांना दिगंबर अवस्थेत दिसून आले. हा दिवस गजानन महाराज प्रकट दिन म्हणून साजरा केला जातो. महाराजांचा जन्मदिवस कोणालाच माहीत नसल्यामुळे त्यांचा प्रकट दिन साजरा केला जातो. गजानन महाराजांचा प्रकट दिन हा एक अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. या दिवशी महाराजांच्या भक्तांना त्यांची कृपा आणि आशीर्वाद मिळतात. त्या अनुषंगाने नवापूर शहरातील
जनता पार्क येथील गजानन महाराज यांच्या मंदिरात सालाबादप्रमाणे यंदाही श्री गजानन महाराज प्रकट दिवसानिमित्ताने होमहवन आणि जाहीर भंडाऱ्याचे आयोजन श्री. गजानन महाराज मंदिर, जनता पार्क गली नंबर ४, नवापूर येथे करण्यात आले होते, गजानन महाराजांच्या मंदिरात विविध रोषणाईसह विधिवत पूजन करण्यात आले. पहाटेपासून दर्शनासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. दरवर्षी या ठिकाणी कार्यक्रम अत्यंत चांगल्या पद्धतीने करण्यात येतो. नवापूर शहरात गजानन महाराजांचे हे एकमेव मंदिर आहे. गजानन महाराजांच्या प्रगट दिनानिमित्त नवापूर शहरातील असंख्य युवक व महिलांनी या ठिकाणी सेवा दिली. महाप्रसाद (भंडारा ) च्या नवापूर शहरातील असंख्य भाविक भक्तांनी घेतला.यावेळी नवापूरचे लोकप्रिय आमदार शिरिषकुमार नाईक, माजी नगराध्यक्ष दामु आण्णा बिराडे ,धनंजय गावीत,योगेश चौधरी, दिलीप पवार, प्रकाश पाटील, अजय पाटील, चंद्रकांत नगराळे सह परिसरातील असंख्य गजानन भक्तांनी परिवारासह दर्शनाचा आणि महाप्रसादाचा लाभ घेतला
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मंदिराचे संचालक सुनंदा खैरनार, सेवानिवृत्त ग्राम विकास अधिकारी संजय भिकन खैरनार, आशा खैरनार व कृष्णा भिकन खैरनार, इंजीनियर सचिन संजय खैरनार, गजानन कंन्स्ट्रक्शन, डॉ . मनीष कृष्णा खैरनारसह परिसरातील नागरिकांनी परिश्रम घेतले.