प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण टप्पा-२ अंतर्गत नंदुरबार जिल्ह्यातील ६७हजार लाभार्थ्यांना मंजुरी पत्र व पहिला हप्ता वितरित करण्याचा राज्यव्यापी उपक्रम संपन्न झाला . सदरील कार्यक्रम ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद स्तरावर पार पडला असून, राज्यस्तरीय कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण देखील दाखविण्यात आले .
पुणे येथे आयोजित राज्यस्तरीय कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व संबंधित मंत्रीच्या उपस्थित संपूर्ण राज्यात २० लाख लाभार्थ्यांना मंजुरी पत्र आणि १० लाख लाभार्थ्यांना पहिला हप्ता वितरित करण्यात आला
नंदुरबार जिल्ह्यात २०२४-२५ मध्ये २१ लाख लाभार्थ्यांना मंजुरी पत्र वितरित करण्यात आले यातील ६७ हजार लाभार्थ्यांना पहिला हप्ता मिळला . घरकुलाचे बांधकाम किमान २६९ चौरस मीटर असणे आवश्यक आहे. 'आवास प्लस' अॅपवर घराच्या जीपीएस फोटो अपलोड केल्यानंतरच हप्ता मिळणार आहे. येणाऱ्या दोन आठवड्यात उर्वरित सर्व लाभार्थ्यांना निधी प्रदान केला जाणार आहे.मंजुरी पत्र व पहिला हप्ता वितरित झाल्याने घरकुल लाभार्थीनी शासनाचे आभार मानत समाधान व्यक्त केले आहे.