दिनांक 26 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री उत्सव साजरा करण्यात येणार आहे त्या अनुषंगाने प्रजापिता ब्रह्माकुमारी नवापूर शाखेतर्फे नवापूर शहरातून आध्यात्मिक रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीच्या माध्यमातून शिवरात्रीचे आध्यात्मिक महत्व यातून लोकांपर्यंत पोहोचावं. शिवरात्री आपण का साजरी करतो हे सुद्धा लोकांना माहिती असणे आवश्यक आहे. शिवरात्रीचे आध्यात्मिक महत्त्व समजण्यासाठी आध्यात्मिक रॅली चे आयोजन नवापूर शहरातून मोठ्या उत्साहात करण्यात आले. रॅलीत टेम्पोमध्ये शिवपिंड ठेवून ते सजवण्यात आले होते. शिव शंकराचे विविध गीते वाजवून माईक द्वारे शिवरात्रीचे महत्व लोकांना सांगण्यात येत होते. ठिकठिकाणी रॅलीचे स्वागत करण्यात येऊन भाविक भक्तांनी दर्शन घेतले. प्रसादाचे वाटप करण्यात आले. अध्यात्मिक रॅली संदर्भात पत्रक वाटप करण्यात आली. आपण शिवरात्री का साजरी करतो यामागील कारण सुद्धा रॅली द्वारे सांगण्यात येत होते. रॅलीत प्रजापिता ब्रह्मकुमारी तर्फे आयोजित रॅलीत मोठ्या संख्येने बंधू भगिनी उपस्थित होते. प्रत्येकाच्या हातात प्रजापिता ब्रह्मकुमारी यांचे ध्वज होते.शिव महात्म्य सांगत वातावरण शिवमय झाले होते. जगात शांतता नांदावी. मनुष्य जीवनात जीवन सुख शांती आणावी. विश्व कल्याणाची प्रार्थना करण्यात आली. रॅलीत सर्वांनी पांढरे कपडे परिधान केले होते. मोठ्या संख्येने महिलावर्ग उपस्थित होते.
शहरातील मुख्य मार्गावरून अध्यात्मिक रॅली जाऊन शेवटी सांगता करण्यात आली.