माननीय मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ छत्रपती संभाजीनगर : आरोपित चंदन तष्करी प्रकरण : अटकपूर्व जामीन अर्ज मंजूरीचे महत्त्वपूर्ण आदेश :
February 15, 2025
0
फिर्यादी धर्मेश पटेल, राहणार नवापूर, यांनी आरोपी अनोळखी व इतर यांच्या विरुद्ध पोलीस ठाणे - नवापूर, येथे गुन्हा भा. द. वि. कलम ३७९, ४११, ३४ व वन अधिनियम चे कलम ४१, ४२, ५२ प्रमाणे नोंदविला होता. थोडक्यात माहिती फिर्याद प्रमाणे अशी की, चंदनाची झाडे जमिनीजवळून कोणीतरी कटरने कापून नेले होते. वन विभाग कार्यालय येथे माहिती देऊन पंचनामा केल्यानंतर तक्रार नोंदवण्यात आली होती. पुरवणी जबाब ही नोंदविण्यात आले होते. पोलिसांकडून समजले कि, दुसऱ्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या आरोपींनी सांगितले कि, त्याने व त्याचे साथीदार यांनी संगणमत करून एकत्र येऊन वाहतूक करून सदर चंदनाची झाडे दुसऱ्या आरोपींना दिले होते. त्यांनी पुढील व्यवहार करून एका फॅक्टरी मध्ये विक्री केल्याचे सांगितले होते. अर्जदार हे सदर फॅक्टरीचे मालक व भागीदार असून संशयित म्हणून नाव गोवण्यात आले होते. अर्जदार अहमद व इतर, राहणार तालुका बारशी, जिल्हा सोलापूर, यांनी सदर गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी माननीय सत्र न्यायालय नंदूरबार येथे फौजदारी जामीन अर्ज दाखल केला होता. परंतू, माननीय सत्र न्यायालय नंदूरबार यांनी सदर फौजदारी जामीन अर्ज नामंजूर करण्याचे आदेश पारित केले होते. सदर आदेशाविरुद्ध अर्जदार यांनी माननीय मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ छत्रपती संभाजीनगर येथे अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी एडवोकेट गजेंद्र देविचंद जैन (भंसाली) यांच्यामार्फत अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. माननीय मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ छत्रपती संभाजीनगर (माननीय न्यायमूर्ती श्री. अरुण आर. पेडणेकर) यांनी विशेष करून अनोळखी व्यक्तीविरुद्ध फिर्याद, फिर्याद देण्यास विलंब, अर्जदार हे नोंदणीकृत फॅक्टरी चे मालक व भागीदार, परवानाधारक, कुठलीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही व इतर सर्व बाबींच्या सखोल विचार करून दिनांक १२.०२.२०२५ रोजीच्या आदेशान्वये अटी व शर्तींसह अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर करण्याचे महत्त्वपूर्ण आदेश पारित केले आहेत.