20 मार्च जागतिक चिमणी दिवसानिमित्त आणि 21 मार्च जागतिक जलदिन व वनदिनाचे औचित्य साधून, नंदुरबार सामाजिक वनीकरण विभागातर्फे भव्य जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले!
कमला नेहरू विद्यालय ते नवी नगरपालिका या मार्गावर साजऱ्या झालेल्या या रॅलीला सहाय्यक जिल्हाधिकारी डॉ. अंजली शर्मा यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून सुरुवात झाली.
या रॅलीत सामाजिक वनीकरण विभागाचे अधिकारी, शिक्षक, विद्यार्थी तसेच नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग होता.
रॅलीपूर्वी “चिमणी वाचवा, झाडे लावा - झाडे जगवा” या संदेशावर आधारित पथनाट्य सादर करण्यात आले.
यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधून चिमणी संवर्धन व पर्यावरण संरक्षणाचे महत्व अधोरेखित करण्यात आले.
निसर्गाचे संवर्धन हेच आपले भवितव्य सुरक्षित करणारे साधन आहे!
आपणही पुढाकार घेऊया – चिमण्या वाचवूया, झाडे लावूया, पाणी वाचवूया!
#चिमणीदिवस #वनदिन #जलदिन
“निसर्ग आहे तर आपण आहोत!”
सहभागी रहा, प्रेरणा बना!
सजीव निसर्गासाठी एक पाऊल पुढे…