शहादा नगरपालिकेच्या हद्दीतील मोहिदा रोड, खेतिया रोड, डोंगरगांव रोड, दोंडाईचा रोडवर अनाधिकृत लोखंडी टपऱ्या...भाजीपालाच्या लॉरी,..पत्र्याचे शेड..कच्चे शेडचे अतिक्रमण केले असून दिनांक 01.एप्रिल.2025 ते 05.04.2025 रोजी महाशिवपुराण कथेचे आयोजन करण्यात आलेले असुन सदर कथे स्थळापावेतो भाविकांचे मोहिदा रोड, खेतिया रोड, डोंगरगांव रोड, दोंडाईचा रोड हे जाण्याचे मार्ग असुन केलेल्या अतिक्रमणामुळे रहदारीस मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होणार असुन सदर रहदारी मुळे वित्तीय व जिवित हाणी होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही.
त्याअनुषंगाने नगरपालिका शहादामार्फत संबंधित अतिक्रमधारकांना नोटीस देण्यात आले. असता अनाधिकृत अतिक्रमण 5 दिवसांचे आत सदर जागा पुर्ववत करावे तसे न केल्यास नगरपालिका मार्फत अतिक्रमण काढुन घेण्यात येईल तसेच होणा-या नुकासानास आपण स्वतः जबाबदार राहणार. तसेच आपणांवर महाराष्ट्र नगरपरिषदा नगरपंचायती व औद्दोगिक नगरी अधिनियम 1965 चे कलम 52,53,54 नुसार कारवाई करण्यात येईल. महा शिवपुराण कथे अगोदर अतिक्रमण मोकळे होते की नाही याकडे शहरवाशियांचे लक्ष लागून आहे.
यावेळी शहादा नगरपरिषदचे कर्मचारी, मिलिंद बचाव, अजिंक्य दोडवे यांनी सदरील अतिक्रमण धारकांना नोटीस दिल्या. सदरील अतिक्रमण धारक आपल्या भाजीपालाच्या लॉरी व इतर अतिक्रमण रस्त्यावर आले असता वाहतुकीस अडथळा निर्माण होत असता त्यांना मागे सरकावण्यात आले.. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रतापसिंग मोहिते, कपिल देसले, तेरसिंग शेमले, दिनकर चव्हाण,आणि राठोड उपस्थित होते.. शहादा तालुका प्रतिनिधी कैलास सोनवणे